जगातील सर्वात मोठी आणि लोकप्रिय लीग आयपीएल २०२०चे आयोजन यूएईमध्ये होणार आहे. कोरोना व्हायरसमुळे आयपीएल भारताबाहेर आयोजित केले जात आहे. आयपीएलची सुरुवात १९ सप्टेंबरपासून होणार असून याचा अंतिम सामना १० नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वी आपण त्या ३ भारतीय फलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी एका मैदानावर १०० पेक्षा अधिक सरासरीने धावा केल्या आहेत.
एक मैदान आणि सरासरी १०० पेक्षाही अधिक!
विराट कोहली- सौराष्ट्र क्रिकेट स्टेडिअम (राजकोट)
काही मैदाने अशी असतात जिथे फलंदाज नेहमी धडाकेबाज कामगिरी करतात. त्या मैदानावरील खेळपट्टीवर जेव्हा फलंदाज उतरतात, तेव्हा त्यांच्या बॅटमधून धावा बरसू लागतात. असेच काहीसे भारतीय संघाचा आणि आयपीएल फ्रंचायझी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या (Virat Kohli) बाबतीत आहे. आयपीएलबद्दल बोलायचं झालं, तर राजकोटचे सौराष्ट्र क्रिकेट स्टेडिअम विराटसाठी खूप लकी आहे. विराटची या मैदानावरील सरासरी १६४ आहे. या मैदानावर विराटने २०१६ साली गुजरात लायन्सविरुद्ध शानदार १०९ धावांची शतकी खेळी केली होती.
विराटच्या आयपीएल कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने एकूण १७७ सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३७.८४ च्या सरासरीने ५४१२ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ५ शतके आणि ३६ अर्धशतकेही ठोकली आहेत.
सौरव गांगुली- राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअम (हैद्राबाद)
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्याचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने (Sourav Ganguly) आयपीएलमध्ये ५९ सामने खेळले आहेत. त्यात त्याने २५.४५ च्या सरासरीने १३४९ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ७ अर्धशतकेही ठोकली आहेत. आयपीएलमध्ये त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. परंतु हैद्राबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडिअममध्ये त्याने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना १२३ च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
हार्दिक पंड्या- एम चिन्नास्वामी (चेन्नई)
तसं पाहिलं तर एम चिन्नास्वामी हे स्टेडिअम विराट कोहलीच्या फलंदाजीसाठीही ओळखले जाते. परंतु मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू हार्दिक पंड्यानेही (Hardik Pandya) या मैदानावर चांगल्याच धावा कुटल्या आहेत. पंड्याने चिन्नास्वामी स्टेडिअमवर १०७ च्या सरासरीने धावा केल्या आहेत. पंड्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने ६१ आयपीएल साामने खेळले आहेत. त्यात त्याने २८.८६ च्या सरासरीने १०६८ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट हा १५४ पेक्षा अधिक राहिला आहे.
असे असले तरीही यावर्षी आयपीएलचे आयोजन भारतात होणार नसून यूएईत होणार आहे. त्यामुळे यूएईची खेळपट्टी फलंदाजासाठी उपयुक्त नाहीत. तिथे लाईनच्या हिशोबाने शॉट खेळणे जरा कठीण जाते. आता यूएईत पंड्या आणि विराट त्याच फॉर्ममध्ये फलंदाजी करतात का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
ट्रेंडिंग लेख-
-चाहत्यांना नेहमीच क्रिकेटच्या ड्रेसिंग रुमचे कुतूहल असते, मग ती ड्रेसिंग रुम नक्की असते तरी कशी?
-१९९९मध्ये केले आंतरराष्ट्रीय पदार्पण, आजही ‘ते’ तिघे खेळताय देशासाठी क्रिकेट
-बिली बाऊडेनने आपल्या खास शैलीत बोट उंचावले…आणि वॉर्नचं नाव क्रिकेटमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहीलं गेलं
महत्त्वाच्या बातम्या-
-मुलगा स्टुअर्ट ब्रॉडने केली मोठी चूक, वडील ख्रिस ब्रॉडने सुनावली ‘बाप’ शिक्षा
-हसीन जहां म्हणते; बंगालमध्ये आहे म्हणून सुरक्षित आहे, ‘या’ राज्यात माझं काही खरं नव्हतं