इंडियन प्रीमीयर लीगची क्रिकेटमधील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीगमध्ये गणना केली जाते. अगदी छोट्या गावापासून ते मोठ्या शहरांपर्यंतच्या अनेक खेळाडूंना या स्पर्धेत संधी मिळाली आहे. त्यामुळे अनेक खेळाडू कोट्यावधी रुपयांचे मालक झाले आहेत. तसेच आत्तापर्यंत ५ असे खेळाडू आहेत, ज्यांनी आयपीएलमधून १०० कोटींहून अधिक कमाई आजपर्यंत केली आहे. यात ४ भारतीय खेळाडू आहेत तर १ परदेशी खेळाडू आहे. या लेखामधून या ५ खेळाडूंबद्दल जाणून घेऊ.
५) एबी डिव्हिलियर्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्स हा १०० कोटी कमवणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे. त्याचे मानधन सध्या प्रतिवर्ष ११ कोटी रुपये आहे. आयपीएल २०२१ च्या सत्रादरम्यान त्याची आयपीएलची कमाई १०० कोटींच्यावर गेली आहे. त्यामुळे तो १०० कोटी कामवणारा पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे. आयपीएल २०२१ हंगामाच्या शेवटी, त्याची कमाई १०२.५१ कोटी होईल.
४) सुरेश रैना
साल २०२१ च्या सत्रादरम्यान चेन्नई सुपर किंग्जचा सुरेश रैना १०० कमाई करणारा चौथा भारतीय खेळाडू ठरला आहे. त्याचेही मानधन सध्या प्रतिवर्षी ११ कोटी रुपये आहे आणि आतापर्यंत त्याने २०२० आयपीएलपर्यंत ९९.७ कोटी रूपये कमावले होते. पण आयपीएल २०२१ मध्ये तो १०० कोटी कमावणाऱ्या खेळाडूमध्ये सामील झाला आहे.
३) विराट कोहली
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहली तिसर्या क्रमांकावर आहे. आयपीएलच्या या २०२१ सत्रानंतर तो रोहित आणि धोनीसह १३० कोटी कमाई करणाऱ्या क्लबमध्ये सामील होईल. आतापर्यंत विराटची आयपीएलमधून कमाई १२६.६ कोटी आहे. त्याचे सध्या प्रतिवर्षी मानधन १७ कोटी रुपये आहे.
२) रोहित शर्मा
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा हा आयपीएलचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. २०२० आयपीएल जिंकताच त्याने कर्णधार म्हणून विक्रमी ५वे विजेतेपद मिळवले होते. या यादीत रोहित दुसर्या क्रमांकावर आहे. आयपीएलमधून आतापर्यंतची कमाई १३१ कोटींपेक्षा जास्त आहे.
१) महेंद्रसिंग धोनी
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. २०२० मध्ये धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने ३ वेळा विजेतेपदावर नाव कोरले आहे. चेन्नई धोनीला सध्या प्रतिवर्षी १५ कोटी रुपये मानधन देते. आयपीएलमधून धोनीने आतापर्यंत १३७ कोटींपेक्षा जास्त रुपये कमावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
काय घडलं जेव्हा ‘थाला-चिन्नाथाला’ उभे ठाकले एकमेकांसमोर, स्वतःला रैनाने केला खुलासा