भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना बुधवारी (दि. 22 मार्च) चेन्नई येथे पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलिया संघाने 21 धावांनी जिंकला. या विजयासह ऑस्ट्रेलियन संघाने वनडे मालिका 2-1 अशी आपल्या नावे केली. त्याचबरोबर मागील सात वर्षात भारताला मायदेशात येऊन पराभूत करण्याचा कारनामा ऑस्ट्रेलियाने तीन वेळा करून दाखवला.
या मालिकेतील मुंबई येथील पहिला सामना भारतीय संघाने पाच गडी राखून जिंकला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पुनरागमन करत दहा गड्यांनी विजय साजरा केला. मालिकेतील अखेरच्या व निर्णायक चेन्नई वनडेत भारतीय संघासमोर विजयासाठी 270 धावांचे आव्हान होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाने विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, 21 धावांनी हे प्रयत्न तोकडे पडले. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिका देखील नावावर केली.
भारतीय संघ घरच्या मैदानावर नेहमीच मजबूत कामगिरी करताना दिसला आहे. मात्र, केवळ ऑस्ट्रेलियाचा संघ आहे ज्याने भारतीय संघाला 2016 पासून तीन वेळा मालिका विजयापासून रोखले आहे. 2019 मध्ये ऍरॉन फिंचच्या नेतृत्वात भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने दोन सामन्यांची टी20 मालिका 2-0 अशी खिशात घातली होती. त्यानंतर झालेल्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकत आघाडी घेतलेली. मात्र, त्यानंतर ऑस्ट्रेलियन संघाने पुनरागमन करत पुढील तीनही सामने आपल्या नावे करत मालिका आपल्या नावे केलेली. त्यानंतर आता स्टीव स्मिथच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियन संघ तीच कामगिरी करण्यात यशस्वी झाला आहे.
या दौऱ्यावर सुरुवातीला चार सामन्यांची कसोटी मालिका देखील खेळली गेली होती. पहिल्या दोन सामन्यात ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावे लागले होते. नियमित कर्णधार पॅट कमिन्स याने माघार घेतल्यानंतर पुढील दोन सामन्यात स्मिथ याने संघाचे नेतृत्व केले. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने एक सामना जिंकला तर अखेरचा सामना राखला होता.
(Only Australia Beat Team India In Limited Overs Cricket Since 2016)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
या 4 कारणांमुळे 2003 विश्वचषक ठरला जगातील आजपर्यंतचा सर्वश्रेष्ठ क्रिकेट विश्वचषक
क्रिकेटमध्ये 20 वर्षांपूर्वी घडली होती ‘ती’ दु:खद घटना; बॉथमसोबत तुलना होत असलेल्या 24 वर्षीय खेळाडूने गमावला होता जीव






