भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) नव्या हंगामासाठी नवा नियम लागू करणार आहे. ज्याला ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून ओळखले जाणार आहे. हा नियम बीसीसीआयने याआधी टी20 स्पर्धा सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये वापरला होता. या नियमामुळे संघाला चालू सामन्यात त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणत्याही एका खेळाडूला बदलता येऊ शकते. संघ आणि खेळाडूंना या नियमाची सवय व्हावी यासाठी बोर्डाने आयपीएलपूर्वी राज्य क्रिकेटमध्ये हा नियम लागू केला होता. मात्र, या नियमामध्ये देखील एक नवा ट्विस्ट आला आहे.
काय आहे ‘इम्पॅक्ट प्लेयर’नियम?
नाणेफेकीवेळी प्लेइंग इलेव्हनबरोबर कर्णधाराला 4 अशा खेळाडूंची नावे द्यावी लागतील, ज्यांपैकी एकाला तो सामन्यादरम्यान वापरू शकतो. या 4 पैकी फक्त एका खेळाडूला सब्स्टीट्यूट म्हणून वापरण्याचे बंधन आहे. जर संघ प्रथम फलंदाजी करताना झटपट आपल्या विकेट्स गमावत असेल, तर प्रभाव खेळाडू नियमाअंतर्गत ते प्लेइंग इलेव्हनमधील एखाद्या गोलंदाजाच्या (तळातील फलंदाज) जागी अतिरिक्त फलंदाज वापरू शकतात.
तो इम्पॅक्ट प्लेयर सामन्याच्या 14व्या षटकाच्या आधी संघातील कोणत्याही एका खेळाडूची जागा घेऊ शकतो. यासाठी संघाचे कर्णधार, मुख्य प्रशिक्षक यांना सामन्याचे अधिकारी आणि चौथ्या पंचांना याबाबत सांगावे लागणार आहे.
दुसरीकडे प्रथम फलंदाजी करताना जर संघाने जास्त विकेट्स गमावल्या नाहीत, तर दुसऱ्या डावात संघ एका फलंदाजाच्या जागी अतिरिक्त गोलंदाजाला सहभागी करू शकतो. मात्र सब्स्टीट्यूट खेळाडू आल्यानंतर त्याच्याजागी मैदान सोडावे लागणारा खेळाडू पुन्हा मैदानात उतरू शकत नाही.
हा नियम लागू करण्यात येणार असे सांगितल्यानंतर अवघ्या आठवडाभरात आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलकडून याबाबतचे आणखी एक स्पष्टीकरण देण्यात आले. हा नियम केवळ भारतीय खेळाडूंसाठी असेल. याचाच अर्थ भारतीय खेळाडूच्या जागेवर केवळ भारतीय खेळाडू संघात येऊ शकतो. त्यामुळे विदेशी खेळाडूंना इम्पॅक्ट प्लेयर होण्यासाठी आणखी काही काळ वाट पहावी लागू शकते.
(only indian players are use as impact player in ipl 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसोटी मालिकेसाठी बांगलादेश संघाची निवड, या खेळाडूच्या पुनरागमनामुळे भारताची चिंता वाढली
रविंद्र जडेजाची पत्नी विजयाच्या अगदी जवळ, म्हणाली, ‘गुजरातची जनता…’






