Jai Shah decide Rohit-Virat T20 Future: जूनमध्ये अमेरिकेत होणार्या टी20 विश्वचषकावर सर्वांच्या नजरा लागल्या असताना, आगामी अफगाणिस्तान मालिकेसाठी रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यातील एकाची निवड करणे निवडकर्त्यांसाठी खूप अवघड आहे. आत्तापर्यंत, दोन्ही दिग्गजांना संघात ठेवले जाण्याची शक्यता आहे, परंतु कदाचित आयपीएल दरम्यान फॉर्मात असलेला फलंदाज हा टी20 विश्वचषक संघात निवडला जाईल. याबाबत बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी अंतिम निर्णय घेऊ शकतात.
निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर (Ajit Agarkar) दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दोन्ही दिग्गजांशी बोलण्यासाठी गेले होते आणि दोघांनीही स्वतःला उपलब्ध असल्याचे सांगितले आहे. परंतु बीसीसीआय सचिव जय शाह (Jay Shah) यांनाच आता हा निर्णय घ्यावा लागेल.
पाहुण्या अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यासाठी फक्त पाच दिवस शिल्लक आहेत आणि 11 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने अद्याप संघाची घोषणा केलेली नाही. आगरकर लवकरच संघाची घोषणा करू शकतात. परंतु रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली (Virat Kohli) या दोघांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केल्यास संघाचा समतोल बिघडू शकतो, असे म्हटले जात समजते.
एका माजी राष्ट्रीय निवडकर्त्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “पहिल्या पाचमध्ये रोहित, शुबमन गिल (Shubman Gill) , विराट, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्या असतील तर तुमचा डाव्या हाताचा फलंदाज कुठे आहे? आता समजा, तुम्ही कोहलीला हटवून गिलला तिसऱ्या क्रमांकावर आणि यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) याला रोहितसोबत खेळवा? अजित असं करू शकतो का? धाडसी निर्णय घ्या. जर निवडकर्त्यांनी रोहित आणि कोहली या दोघांचा समावेश केला, तर ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि इशान किशन (Ishan Kishan) या दोघांना मुकावे लागणार आहे.” (Only Jay Shah can decide Rohit-Virat T20 future can take this big decision)
हेही वाचा
Ranji Trophy 2023-24: रणजी ट्रॉफी सामन्यादरम्यान राडा, मुंबईविरुद्ध खेळण्यासाठी बिहारचे 2 संघ पोहोचले मैदानात
BREAKING: अंबाती रायुडूची 9 दिवसांच्या राजकारणातून निवृत्ती, YSRCP सोडून दिला सर्वांना आश्चर्याचा धक्का