IND vs ENG 1st Test: भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील 5 सामन्यांची महत्त्वाची कसोटी मालिका सुरू झाली आहे. दोन्ही संघांमधील या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. या सामन्यात पाहुण्या इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वी अनुभवी फलंदाज विराट कोहली याने पहिल्या दोन कसोटींमधून आपले नाव मागे घेतल्याने भारताला मोठा धक्का बसला. आता पहिल्या सामन्यादरम्यान चाहते विराट कोहलीला खूप मिस करताना दिसले आणि त्याच्या नावाने घोषणाही दिल्या.
भारत आर्मीने आपल्या अधिकृत ट्विटर (X) अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चाहते विराट कोहली (Virat Kohli) याला खूप मिस करताना दिसत आहेत आणि राजीव गांधी स्टेडियमवर पहिल्या दिवशी त्यांनी सतत कोहली-कोहलीचा नारा दिला. विराट कोहलीला खेळताना पाहण्यासाठी ते खूप उत्सुक होते, हे त्यांच्या घोषणांवरून स्पष्ट होते. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. विराट कोहलीच्या चाहत्यांच्या या स्टाइलला सोशल मीडिया यूजर्सकडून खूप पसंती मिळत आहे.
👑 Hyderabad misses you, King. #ViratKohli #INDvENG #INDvsENG #TeamIndia #BharatArmy #COTI🇮🇳 pic.twitter.com/TgFcbRrWjd
— The Bharat Army (@thebharatarmy) January 25, 2024
विराट कोहली इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यांसाठी जाहीर झालेल्या भारतीय संघाचा एक भाग होता. मात्र, ही मालिका सुरू होण्यापूर्वी त्याने वैयक्तिक कारणामुळे पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर जाण्याचा निर्णय घेतला.
या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी भारताचा सर्वात मोठा सामनाविजेता असलेल्या विराट कोहलीचं बाहेर पडणे हा संघासाठी मोठा धक्का होता. त्याच्या जागी रजत पाटीदारचा संघात समावेश करण्यात आला आहे, जो पहिल्या सामन्यात खेळणाऱ्या भारतीय प्लेइंग इलेव्हनचा भाग नाही. (Only Kohli’s name chanted in the stadium despite Rohit-Bumrah in the team watch video)
हेही वाचा
IND vs ENG: रुटने 92 वर्ष जुना विक्रम मोडला, ठरला भारताला सर्वात जास्त त्रास देणारा क्रिकेटर
IND vs ENG: आता जडेजाला ‘सर’ म्हणायला हरकत नाही, केलाय न मोडता येणारा विक्रम