दुबई | भारतीय संघाचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माने काल(19 सप्टेंबर) एशिया कपमधील पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 294 वा षटकार खेचला. त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 294 सामन्यात 294 षटकार मारले आहेत.
याबरोबर जागतिक क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो 7व्या स्थानावर आला आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर 476 षटकारांसह संयुक्तरित्या विंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल आणि पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आहे.
विशेष म्हणजे रोहित आणि गेल या दोघांनी त्यांनी खेळलेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यापेक्षा जास्त किंवा सामन्याइतकेच षटकार मारले आहेत. या दोघांव्यतिरिक्त असा कारनामा आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत किमान 200 षटकार मारणाऱ्या क्रिकेटपटूंपैकी एकालाही करता आलेला नाही.
रोहितने आत्तापर्यंत 294 आंतरराष्ट्रीय सामन्यात 294 षटाकर आणि गेलने 443 सामन्यात 476 षटकार मारले आहेत.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू-
476 – शाहिद आफ्रिदी (सामने- 524)
476 – ख्रिस गेल (सामने- 443)
398 – ब्रेंडन मॅक्युलम (सामने- 432)
352 – सनथ जयसुर्या (सामने- 586)
342 – एमएस धोनी (सामने- 506)
328 – एबी डिविलियर्स (सामने- 420)
294 – रोहित शर्मा (सामने- 294)
महत्त्वाच्या बातम्या:
–या कारणामुळे सुनील गावस्करांनी फकार जामन आणि दिनेश कार्तिकला सुनावले खडेबोल
–धोनीच्या त्या निर्णयामुळे माझे आयुष्य बदलले- केदार जाधव
–एशिया कप २०१८: टीम इंडियाला मोठा धक्का, हे तीन खेळाडू स्पर्धेबाहेर