प्रो कबड्डी सीजन ७ ला आजपासून सुरुवात होत आहे. आतापर्यंत झालेल्या सहा सीजन मध्ये प्रो कबड्डीत अनेक विक्रम झाले आहेत. प्रो कबड्डीत दिवसेंदिवस नवीन विक्रम पुढेही होणार आहेत.
यामधील एक असा विक्रम आहे जो प्रो कबड्डीच्या इतिहासात फक्त २ खेळाडूंना आत्तापर्यंत करता आला आहे. तो विक्रम म्हणजे चढाईत व पकडीत दोन्हीमध्ये २०० पेक्षा जास्त गुण मिळवण्याची कामगिरी. चढाईत व पकडीत दोन्ही मध्ये चांगला प्रदर्शन करणाऱ्या खेळाडु कबड्डीतील एक अष्टपैलू असतो.
अशी कामगिरी करणाऱ्या खेळाडूंनी पैकी पहिला खेळाडु म्हणजे मनजीत चिल्लर. मनजीत चिल्लरने प्रो कबड्डीत आजपर्यंत ९३ सामने खेळले असून पकडीत ३०२ गुण तर चढाईत २२० गुण मिळवले आहेत. तर दुसरा खेळाडु संदीप नरवाल, त्याने १०१ सामन्यांत पकडीत २५४ तर चढाईत २२९ गुण मिळवले आहेत.
प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये मनजीत चिल्लर तामिळ थालवाज तर संदीप नरवाल यु मुंबा कडून खेळणार आहेत. मनजीत चिल्लर प्रो कबड्डीमध्ये पकडीत सर्वात जास्त गुण मिळवण्याच्या यादीत अग्रस्थानी आहे तर संदीप नरवाल तिसऱ्या स्थानी आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–मुलाखत: प्रो कबड्डी सीजन ७ मध्ये नवा नवीन बघायला मिळेल- नवीन कुमार
–प्रो कबड्डी ७ लेग १: तेलगू टायटन्स विरुद्ध यु मुंबा लढत, सिद्धार्थ देसाईंकडे सर्वांच्या नजरा.
–काय सांगता! या संघाचा प्रशिक्षक कर्णधारापेक्षाही आहे तब्बल ७ वर्षाने लहान