---Advertisement---

बापरे! एकाच सामन्यात 11 पैकी 7 डावखुरे क्रिकेटर खेळले होते टीम इंडियाकडून

On: शनिवार, ऑगस्ट 13, 2022 12:16 PM
---Advertisement---

क्रिकेटमध्ये एखाद्या संघात उजव्या आणि डाव्या हाताचे सारख्या प्रमाणात खेळाडू असतील तर संघातील समतोल चांगला समजला जातो. पण बऱ्याचदा संघात उजव्या हाताचे खेळाडू अधिक असल्याचे दिसून येते. त्यामुळे एकाच संघाकडून ५ किंवा त्यापेक्षा अधिक डावखुरी फलंदाजांनी फलंदाजी केलेली फार कमी वेळा ऐकण्यात येते. भारतीय संघाबाबातही असे खूप कमी वेळा झाले आहे.

भारतीय संघाकडून पहिल्यांदाच पहिल्या सात फलंदाजांपैकी पाच डावखुऱ्या फलंदाजांनी वनडेत फलंदाजी करण्याची घटना कोलंबा येथे २८ ऑगस्ट १९९९ ला ऑस्ट्रेलिया विरुद्ध आयवा कपमध्ये घडली होती. त्यावेळी सौरव गांगुली, सदागोपन रमेश, अमेय खुरासिया, विनोद कांबळी आणि रॉबिन सिंग या डावखुऱ्या फलंदाजांनी भारतीय संघाकडून फलंदाजी केली होती. पण हा सामना ऑस्ट्रेलियाने ४१ धावांनी जिंकला होता.

या सामन्याआधी एप्रिल १९९९मध्ये भारतीय संघ ५ डावकरी क्रिकेटपटूंसह खेळला होता. पंरतु त्या सर्वांनी फलंदाजी केली नव्हती.

२८ ऑगस्ट १९९९ नंतर सिंगापूर चॅलेंज १९९९ मालिकेत ५ सप्टेंबरला झालेल्या वेस्ट इंडिज विरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाकडून ६ डावखुऱ्या फलंदाजांनी फलंदाजी केली होती. त्यावेळी सौरव गांगुली, सदागोपन रमेश, अमेय खुरासिया, विनोद कांबळी, रॉबिन सिंग आणि सुनील जोशी या ६ डावकरी फलंदाजांनी फलंदाजी केली होती.

विशेष म्हणजे त्यानंतर जवळपास १ वर्षांनी भारतीय संघाकडून तब्बल ७ डावखुऱ्या फलंदाजांनी फलंदाजी केली होती. हा विक्रम आजही अबाधित आहे. २७ ऑक्टोबर २००० ला श्रीलंकेविरुद्ध शारजाह येथे झालेल्या कोको-कोला चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सामन्यात भारताकडून गांगुली, श्रीधरन श्रीराम, रॉबिन सिंग, विनोद कांबळी, युवराज सिंग, हेमांग बदानी आणि सुनील जोशी या ७ डावखुऱ्या फलंदाजांनी फलंदाजी केली होती.

खास गोष्ट म्हणजे हा एक विश्वविक्रम असून आत्तापर्यंत भारताव्यतिरिक्त श्रीलंका आणि वेस्ट इंडिज संघाच्याही नावावर आहे. त्यांच्याकडूनही वनडेत ७ डावकरी फलंदाजांनी फलंदाजी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

इंग्लंडमध्ये पुजारा कडाडला! १३५ च्या स्ट्राईक रेटने ठोकले झंझावाती शतक

भारताच्या ‘या’ महिला खेळाडूला अश्लील मेसेज, तक्रार दाखल

मोठी बातमी: व्हीव्हीएस लक्ष्मण पुन्हा टीम इंडियाचे हेड कोच; या कारणाने घेतला गेला निर्णय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---