---Advertisement---

पृथ्वी शॉ ‘या’ अभिनेत्रीसोबत काश्मीरमध्ये घेतोय सुट्ट्यांचा आनंद, सर्वत्र रंगलीय इंस्टा स्टोरीची चर्चा

On: मंगळवार, फेब्रुवारी 7, 2023 2:44 PM
Prithvi-Shaw-And-Nidhi-Tapadia
---Advertisement---

भारतीय संघाचा युवा सलामीवीर फलंदाज पृथ्वी शॉ सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमधील रणजी ट्रॉफी स्पर्धेत धावांचा पाऊस पाडला आहे. यामुळे त्याचे भारतीय संघात पुनरागमनही झाले. त्याची चर्चाही चांगलीच रंगलीये. अशात तो पुन्हा एका कारणामुळे चर्चेत आला आहे. ते कारण म्हणजेच, पृथ्वी सध्या पृथ्वीवरील ‘स्वर्ग’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. तो सध्या त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सुट्ट्यांचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असतो. अशातच तो सध्या अभिनेत्री आणि मॉडेल निधी तापडिया हिच्यासोबत काश्मीरमध्ये सुट्ट्या घालवत आहे. मागील काही काळापासून पृथ्वी आणि निधीचे नाव एकमेकांसोबत जोडले जात आहे.

विशेष म्हणजे, पृथ्वी शॉ आणि निधी तापडिया (Prithvi Shaw And Nidhi Tapadia) हे दोघेही नेहमी एकमेकांच्या इंस्टाग्राम पोस्टवर एकमेकांना टॅग करण्यासोबतच लव्ह इमोजीही शेअर करत असतात.

https://www.instagram.com/p/Ci-YZy6o4Gm/?hl=en

अशात पृथ्वी आणि निधी (Prithvi And Nidhi) यांनी त्यांच्या इंस्टाग्राम स्टोरीवर बर्फ पडतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. दोघांचाही व्हिडिओ एकसारखाच आहे. या व्हिडिओसोबत पृथ्वीने कॅप्शनमध्ये ‘जन्नत’ असे लिहिले आहे. याव्यतिरिक्त या व्हिडिओसोबत पृथ्वी आणि निधीने आमिर खानच्या ‘फना’ सिनेमातील ‘तू जो साथ हो, फिर क्या ये जहां…’ हे गाणेही लावले आहे.

Prithvi-Shaw-Story
Photo Courtesy: Instagram/prithvishaw
Nidhi-Tapadia-Story
Photo Courtesy: Instagram/nidhhitapadiaa

निधीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर बर्फातील काही फोटोही शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये निधी पांढऱ्या रंगाच्या टी शर्ट, पांढऱ्या पँटमध्ये आणि राखाडी रंगाच्या ओव्हरकोटमध्ये दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वर्तमानात स्वर्गात राहत आहे.” निधी तापडिया (Nidhi Tapadia) हिने या फोटोंचे क्रेडिट पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याला दिले होते. मात्र, ते तिने नंतर हटवले आहे.

https://www.instagram.com/p/CoUbPDypV-J/?hl=en

निधीने तिच्या फोटोंचे क्रेडिट पृथ्वीला देण्यावरून स्पष्ट होते की, दोघेही काश्मीरमध्ये एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. केएल राहुल आणि अथिया शेट्टी (KL Rahul And Athiya Shetty) यांच्यानंतर पृथ्वी शॉ आणि निधी तापडिया हीदेखील क्रिकेट-बॉलिवूडची नवीन जोडी बनताना दिसत आहे. विशेष म्हणजे, पृथ्वी आणि निधी यांच्यापैकी कुणीही त्यांचे नाते अधिकृतरीत्या स्वीकारले नाहीये. मात्र, त्यांचे एकमेकांच्या पोस्टवरील प्रेमाने भरलेल्या कमेंट्स पाहून नेटकरी हे प्रेमप्रकरण असल्याचे म्हणत आहेत. चाहत्यांनी तर निधीला पृथ्वी शॉची गर्लफ्रेंड देखील मानले आहे.

https://www.instagram.com/p/Cm6WdaFoIGE/?utm_source=ig_web_copy_link

निधीबद्दल थोडक्यात
निधी तापडिया हिचा जन्म 13 डिसेंबर, 1997मध्ये महाराष्ट्रात झाला आहे. ती एक मॉडेल आमि अभिनेत्री आहे. तिने कुलविंदर बिल्ला: जट्टा कोका (2019), गजेंद्र वर्मा: याद करके (2019) आणि गिप्पी ग्रेवाल फिट गुलरेज अख्तर: सोने दी डब्बी (2020) यांसारख्या म्युझिक अल्बममध्ये काम केले आहे. निधी ही सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. निधी तापडिया इंस्टाग्राम (Nidhi Tapadia Instagram) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असून तिला 1 लाख 8 हजारांहून अधिक लोक फॉलो करतात. विशेष म्हणजे, निधीचे नाव पृथ्वीसोबत जोडल्यानंतर तिच्या चाहत्यांमध्ये कमालीची वाढ होत आहे.

दोन वर्षांचे अंतर
पृथ्वी आणि निधीच्या वयामध्ये 2 वर्षांचे अंतर आहे. निधी 1997 सालची आहे, तर पृथ्वी शॉचा जन्म 1999मध्ये झाला आहे. अशात निधी ही पृथ्वीपेक्षा 2 वर्षांनी मोठी आहे. त्यांचे हे नाते कधीपासून सुरूये याची कुणालाही माहिती नाहीये. मात्र, त्यांनी नवीन वर्षाचा जल्लोष एकत्र केला होता. पृथ्वीने निधीसोबतचे फोटो शेअर केले होते. तेव्हापासूनच त्यांच्या नात्याविषयीच्या चर्चांनी जोर धरला आहे. (opener prithvi shaw enjoying with rumoured girlfriend actress nidhi tapadia in kashmir snowfall shared photos see here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेत ‘किंग कोहली’च्या निशाण्यावर 3 रेकॉर्ड, सचिनच्या विक्रमालाही बसू शकतो धक्का
‘हा’ खेळाडू करणार पदार्पण? ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटीच्या 48 तासांपूर्वीच माजी प्रशिक्षकाचा मोठा दावा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---