---Advertisement---

अरेरे! दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत भारतीय सलामी जोडीच्या नावावर लाजीरवाणा विक्रम, 7 वर्षांनंतर ओढवली ‘अशी’ वेळ

Yashasvi-Jaiswal-And-Shubman-Gill
---Advertisement---

Shubman And Yashasvi Unwanted Record: विस्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असलेली भारतीय सलामी जोडी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20त खास प्रदर्शन करू शकली नाही. यशस्वी जयसवाल आणि शुबमन गिल यांनी आपल्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला. सेंट जॉर्ज पार्कच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी20त भारताकडून यशस्वी आणि शुबमन दोघेही भोपळाही न फोडताच तंबूत परतले.

या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाकडून यशस्वी जयसवाल आणि शुबमन गिल (Yashasvi Jaiswal And Shubman Gill) यांनी डावाची सुरुवात केली होती. यावेळी पहिल्याच षटकात यशस्वी जयसवाल (Yashasvi Jaiswal) मार्को यान्सेन (Marco Jansen) याच्या तिसऱ्या चेंडूवर झेलबाद झाला. तो 3 चेंडू खेळून तंबूत परतला. त्यानंतर शुबमन गिल (Shubman Gill) लिझाद विलियम्स (Lizaad Williams) टाकत असलेल्या दुसऱ्या षटकातील अखेरच्या चेंडूवर पायचीत बाद झाला. त्याला 2 चेंडूत एकही धाव न करता पव्हेलियनचा रस्ता पकडावा लागला. अशाप्रकारे दोघांच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला. 7 वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये भारताच्या सलामी जोडीने शून्यावर विकेट गमावली.

नकोसा विक्रम
खरं तर, 2016 साली भारत विरुद्ध पाकिस्तान (INDvsPAK) संघात खेळल्या गेलेल्या सामन्यात रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे (Rohit Sharma And Ajinkya Rahane) सलामीला उतरले होते. यावेळी दोघेही शून्यावर बाद झाले होते. ही पहिलीच वेळ होती, जेव्हा टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताचे दोन्ही दिग्गज फलंदाज शून्यावर बाद झाले होते. त्यानंतर आता 7 वर्षांनी यशस्वी जयसवाल आणि शुबमन गिल या जोडीने हा नकोसा विक्रम आपल्या नावावर केला.

भारताची खराब सुरुवात
नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय संघाला दुसऱ्या टी20त चांगली सुरुवात करता आली नाही. भारताच्या सलामीवीरांनी 6 धावांवर तंबूचा रस्ता पकडला. डावातील तिसऱ्या चेंडूवर जयसवाल यान्सेनच्या जाळ्यात अडकला. त्याला डेविड मिलर याने कोणतीही चूक न करता झेलबाद केले. तसेच, गिलही खाते न खोलता पायचीत बाद झाला.

त्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) यांनी संघाचा डाव सावरला. तसेच, संघाची धावसंख्या 50 धावांच्या पलीकडे नेली. सूर्याने 36 चेंडूत 56 धावा केल्या. तसेच, रिंकू सिंग याने आंतरराष्ट्रीय टी20 कारकीर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. त्याने सामन्यादरम्यान 39 चेंडूत सर्वाधिक नाबाद 68 धावा केल्या. त्याच्या खेळीत 2 षटकार आणि 9 चौकारांचा समावेश होता. (opener yashasvi jaiswal shubman gill duck out in ind vs sa 2nd t20 created unwanted record in 7 years)

हेही वाचा-
INDvsSA: दक्षिण आफ्रिकेला घाम फोडणाऱ्या रिंकूने सामन्यानंतर का मागितली माफी? लगेच वाचा
कमबॅक असावं तर असं! 2 वर्षांनी टी20त परतताच रसेलचा राडा, ऑलराऊंड प्रदर्शनाने इंग्लंडला फोडला घाम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---