पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने दोन दिवसांपूर्वी केलेले वक्तव्य आता त्याला चांगलेच महागात पडले आहे. भारतातील अनेक दिग्गज खेळाडूंनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
जम्मू-काश्मीरमध्ये दोन दिवसांपूर्वी भारतीय लष्कराने अतिरेक्यांना कंठस्नान घातले होते. यावर आफ्रिदीने ट्विट करत भाष्य केले होते.
यावर आज भारताचा सलामीवीर शिखर धवनने आज जोरदार प्रतिक्रीया देताना आफ्रिदीला खडे बोल सुनावले आहे.
“पहिली पाकिस्तानची परिस्थिती सुधार. तुझे विचार तुझ्या जवळ ठेव. आम्ही आमच्या देशात जे करत आहोत ते चांगलचं आहे. पुढे काय करायचं आहे ते आम्हाला चांगलं माहित आहे. जास्त डोकं नको चालवू. ” असे शिखर आपल्या ट्विटमध्ये म्हणाला आहे.
Pehle khudke desh ki haalat sudharo. Apni soch apne paas rakho. Apne desh ka joh hum kar rahe hai woh acha hi hai aur aage jo karna hai woh humein ache se pata hai. Zyaada dimaag mat lagao @SAfridiOfficial
— Shikhar Dhawan (@SDhawan25) April 5, 2018
काही दिवसांपूर्वी आफ्रिदीने ट्विट केले होते. “भारत व्याप्त काश्मीर (जम्मू काश्मीर) येथील परिस्थिती चिंताजनक आहे. याठिकाणी स्वातंत्र्य आणि स्वत:च्या निर्णयावर बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यांचा आवाज दाबला जात आहे. निरपराध लोकांना येथे मारले जात आहे. याबाबत संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना का पुढाकार घेत नाहीत? हा रक्तपात थांबविण्यासाठी त्या का प्रयत्न करत नाहीत?” असे त्याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते.
Appalling and worrisome situation ongoing in the Indian Occupied Kashmir.Innocents being shot down by oppressive regime to clamp voice of self determination & independence. Wonder where is the @UN & other int bodies & why aren't they making efforts to stop this bloodshed?
— Shahid Afridi (@SAfridiOfficial) April 3, 2018
परवा पुन्हा ट्विट करत त्याने गरळ ओकली होती.
https://twitter.com/SAfridiOfficial/status/981224337645686785
यावर दोन दिवसांत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, गौतम गंभीर, विराट कोहली, सुरेश रैना सारख्या खेळाडूंनी प्रतिक्रीया दिल्या आहेत.