भारत-इंग्लंड यांच्यात १ ऑगस्टपासून पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु होत आहे.
या मालिकेत चमकदार कामगिरी करत भारताचा कर्णधार विराट कोहलीला कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याची संधी आहे.
सध्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी ९२९ रेटिंग्ससह ऑस्ट्रेलियाचा स्टिव स्मिथ आहे.
तर दुसऱ्या स्थानी ९०३ रेटिंग्ससह भारताचा कर्णधार विराट कोहली आहे.
स्टिव स्मिथ आणि विराट कोहली यांच्यामध्ये आता फक्त २६ रेटिंग्सचे अंतर अाहे. या कसोटी मालिकेत विराटने दमदार कामगिरी केल्यास तो स्टिव स्मिथला मागे टाकत अव्वल स्थान प्राप्त करु शकतो.
सध्या चेंडू छेडछाड प्रकरणामुळे स्टिव स्मिथवर एक वर्षाची बंदी आहे. त्यामुळे पुढील मार्चपर्यंत त्याला कसोटी क्रिकेट खेळता येणार नाही.
कोहलीबरोबरच भारतीय संघातील चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, मुरली विजय आणि शिखर धवने या फलंजांना देखील कसोटी क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी असणार आहे.
इंग्लंडकडूनही जो रुट, अॅलिस्टर कुक, जॉनी बेअस्ट्रो, बेन स्टोक्स आणि मोइन अली यांना फलंदाजांच्या कसोटी क्रमवारीत पुढे जाण्याची संधी आहे.
कसोटी क्रमवारीत भारताच्या विराट कोहली नंतर इंग्लंडचा कर्णधार जो रुट ८५५ रेटिंग्ससह तिसऱ्या स्थानी आहे.
तर गोलंदाजी क्रमवारीत अव्वल तीसमध्ये असणाऱ्या रविंद्र जडेजा, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्याकडेही गोलंदाजी क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी आहे.
इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन संध्या गोलंदाजी क्रमवारीत ८९२ रेटिंग्ससह अव्वल स्थानी आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
-मिसेस गायतोंडे आहे सेक्रेड गेम्समधील धोनीचं आवडत पात्र
-षटकार आणि गेल! पुन्हा एकदा ख्रिस गेलचा क्रिकेटमध्ये धुमाकूळ