---Advertisement---

WMPL 2025 ऑरेंज कॅपसाठी सोलापूर स्मॅशर्सच्याच रणरागिणींमध्ये चुरस

On: बुधवार, जून 11, 2025 9:15 PM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित वुमेन्स महाराष्ट्र प्रिमियर लीग स्पर्धा आपल्या अखेरीकडे आली आहे. स्पर्धेतील केवळ दोन साखळी सामने शिल्लक असून, अंतिम सामन्यातील संघदेखील निश्चित झाले आहेत. अशात ऑरेंज कॅपसाठीची चुरसही चांगलीच निर्माण झाली आहे.

स्पर्धेत आत्तापर्यंत सर्व संघांनी प्रत्येकी पाच सामने खेळले आहेत. साखळी फेरीतील अखेरचे दोन सामने गुरुवारी (12 जून) खेळले जाणार आहेत. यामध्ये यापूर्वीच अंतिम सामन्यात जागा पक्की केलेले सोलापूर स्मॅशर्स व पुणे वॉरियर्स भिडतील. तर, दुसऱ्या सामन्यात रत्नागिरी जेट्स व रायगड रॉयल्स सामने-सामने येणार आहेत. त्यानंतर 14 जून रोजी स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाईल. हा अंतिम सामना गहूंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सायंकाळी सात वाजता सुरू होईल.

सोलापूर स्मॅशर्स संघाची कर्णधार व आंतरराष्ट्रीय खेळाडू तेजल हसबनीस आतापर्यंत स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज राहिली आहेत. तिने आतापर्यंत पाच सामने खेळताना 239 धावा केल्या आहेत. आपल्या संघाला अंतिम सामन्यात नेताना तिने स्वतः उदाहरण होऊन कामगिरी केली आहे.

सोलापूर संघाचीच सलामी फलंदाज ईश्वरी सावकार हिने देखील आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने संघाच्या विजयात मोठे योगदान दिले आहे. मागील दोन सामन्यात ती सामन्याची मानकरी ठरली. तिने आत्तापर्यंत पाच सामने खेळताना 203 धावा बनवण्यात यश मिळवले आहे. ईश्वरी अवसरे हीच्यासोबत तिने संघासाठी दमदार सलामी देण्याचे काम केलेले दिसते.

डब्लूएमपीएलमध्ये सहभागी झालेल्या नावांपैकी सर्वात मोठे नाव असलेल्या स्मृती मंधाना हिने देखील शानदार कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. रत्नागिरी जेट्स संघाचे नेतृत्व करताना तिने 5 सामन्यात 152 धावा केल्या. यामध्ये दोन अर्धशतके सामील आहेत. मात्र, ती आपल्या संघाला अंतिम फेरीपर्यंत घेऊन जाऊ शकली नाही.

डब्लूएमपीएलच्या पहिल्या हंगामात ज्या फलंदाजाने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ती म्हणजे रत्नागिरी जेट्सची गौतमी नाईक. आक्रमक खेळाचा उत्कृष्ट नमुना सादर करत तिने स्वतःची दखल घ्यायला भाग पाडले. जवळपास प्रत्येक सामन्यात तिला चांगली सुरुवात मिळाली. तिने आतापर्यंत पाच सामन्यात 151 धावा केल्या आहेत. महाराष्ट्र संघाची पुढची स्टार खेळाडू म्हणून तिच्याकडे पाहिले जातेय.

पुणे वॉरियर्स संघ स्पर्धेच्या अंतिम फेरी प्रवेश करण्यात यशस्वी ठरला आहे. उत्कृष्ट सांघिक कामगिरी या संघाने केल्याचे दिसते. असे असताना संघाची युवा अष्टपैलू खुशी मुल्ला हिने सर्वाधिक 141 धावा आपल्या बॅटमधून काढल्या आहेत. उर्वरित दोन सामन्यात देखील तिच्याकडून संघाला अशाच कामगिरीची अपेक्षा असेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---