एलिमिनेटरमधील सामन्यात राजस्थान रॉयल्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पराभव केला होता. या पराभवानंतर फाफ डु प्लेसिसच्या नेतृत्वाखालील आरसीबीचा आयपीएल 2024 मधील प्रवास संपला. त्याचबरोबर या मोसमाच्या फायनल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव करत तिसऱ्यांदा विजेतेपद पटकावले.
मात्र या हंगमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट कोहली अव्वल स्थानावर राहिला. विराट कोहलीने 15 सामन्यात 61.75 च्या सरासरीने 741 धावा केल्या आहेत. यानंतर ऋतुराज गायकवाडनं 14 सामन्यांत 53.00 च्या सरासरीने 583 धावा केल्या आहेत.
विराट कोहलीला ऑरेंज कॅपचा विजेता म्हणून निवडण्यात आले. यानंतर विराट कोहलीने आपले मत मांडले. विराट कोहली म्हणाला की-ऑरेंज कॅप मिळणे हा सन्मान आहे. या हंगामातील प्रवास आमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला होता. पण मी माझ्या संघासाठी ज्या प्रकारे योगदान दिले त्यामुळे मी खूप आनंदी आहे. विशेषत: या हंगामाच्या सुरुवातीस आमच्या संघाची कामगिरी निराशाजनक होती. मात्र उत्तरार्धात आम्ही शानदार खेळ केला. तुमच्या पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार. तर विराट कोहलीच्या जागी कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने ऑरेंज कॅप घेतली.
आयपीएल फायनलच्या पुरस्कार वितरण समारंभात जेव्हा हर्षा भोगलेंनी ऑरेंज कॅप साठी विराट कोहलीच्या नावाची घोषणा केली, त्यावेळी चेपाॅक स्टेडियमवर *कोहली- कोहली* च्या जयघोषानी मैदन उसळून निघाला. चेपाॅक स्टेडियमध्ये चाहते सलग कोहलीचं नाव घेत होते. आयपीलच्या शेवटच्या साखळी सामन्यात राॅयल चॅलेंजर्स बंगळुरुनं चेन्नई सुपर किंग्जला पराभव करुन आयपीएल 2024 मध्ये बाहेरचा रस्ता दाखवला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
टीम इंडियाचा ‘गब्बर’ दिसणार बिग बॉस मध्ये? वैवाहिक जीवन आहे खूप व
रहमानउल्ला गुरबाजच्या आईचं स्वप्न पूर्ण! विजयानंतर म्हणाला, “मला वाटते की माझी आई…”
शाहरुख खाननं रिंकू सिंहसोबत केली मस्ती, घट्ट मिठी मारून बोलला ‘हे’ दोन शब्द