पुणे| टाटा सारख्या उद्योग समूहाचे या स्पर्धेला मिळालेलं पाठबळ आणि कोरोना नियमांची अंमलबजावणी यामुळे या स्पर्धेला महाराष्ट्र सरकारने पाठिंबा दिला असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी चौथ्या टाटा ओपन महाराष्ट्र टेनिस स्पर्धेच्या करंडकाच्या अनावरण प्रसंगी सांगितले.
या अनावरण प्रसंगी मदत व पुनर्वसन विभाग मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार दत्ता भरणे, स्पर्धेचे संचालक प्रशांत सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले की, या स्पर्धेचे संयोजन कोविड आरोग्य नियमांचे काटेकोरपणे पालन करून होणार आहे.प्रेक्षकांना या स्पर्धेच्या ठिकाणी प्रवेश देण्यात येणार नसल्याचा निर्णय संयोजन समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.टाटा सारख्या उद्योग समूहाने याला पाठबळ दिले आहे आणि हा उद्योग समूह नेहमीच आघाडीवर राहिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘आठव्या क्रमांकावर फलंदाजी थोडी लवकर होईल, मला ११ नंबरला ठेवा’; जडेजाचे ट्वीट का आहे चर्चेत?
वर्ल्ड जायंट्स ठरले लिजेंड्स लीग क्रिकेटचे ‘दिग्गज’, आशिया लायन्सला २५ धावांनी नमवत मिळवले जेतेपद
हेही पाहा-