चीन येथे सुरु असलेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय आणि समीर वर्मा यांनी दुसऱ्या फेरीत प्रेवेश केला आहे.
सोमवारी (3 जुलै) झालेल्या आपल्या पहिल्या सामन्यात एचएस प्रणॉयने न्यूझीलंडच्या अभिनव मनोताचा 21-12, 21-11 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.
तर समीर वर्माने फ्रांसच्या लुकास कोरवीचा 21-13, 21-10 असा पराभव केला.
पुढील फेरीत आशिया बॅडमिंटन चॅम्पियन्सशीप स्पर्धेचा विजेता एचएस प्रणॉयला ब्राझीलच्या गॉर कोहेलोचा सामना करावा लागणार आहे.
तर समीर वर्मासमोर पुढच्या फेरीत चीनचा दोन वेळचा ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेता दिग्गज लिन डॅनचे आव्हान असणार आहे.
राष्ट्रकुल स्पर्धेपासून फॉर्ममध्ये असलेली भारताची मिश्र दुहेरी स्वस्तिकराज रांकारेड्डी आणि अश्विनी पोनप्पाने डेनमार्कच्या निक्लास नोहर आणि सारा थॅगसेन यांचा 21-9, 22-20 असा पराभव केला.
स्वस्तिकराज रांकारेड्डी आणि अश्विनी पोनप्पाचा पुढील फेरीतील सामना जर्मनीच्या मार्क लॅम्सफस आणि इसाबेल हेर्टीच यांच्या विरुद्ध होणार आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
-महिला हॉकी विश्वचषक: बाद फेरीत भारतीय संघासमोर दुबळ्या इटलीचे आव्हान
-अॅलिस्टर कुक म्हणतो, यामुळेच भारतीय संघ अव्वल स्थानी