Loading...

अॅलिस्टर कुक म्हणतो, यामुळेच भारतीय संघ अव्वल स्थानी

बर्मिंघहम | इंग्लंडचा माजी कर्णधार आणि सलामीवीर अॅलिस्टर कुकच्या मते पूर्वीपेक्षा यावेळी भारतीय गोलंदाजांची फळी भक्कम आहे.

भारता विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत अॅलिस्टर कुकने प्रामुख्याने भारताची गोलंदाजी, फलंदाजी आणि त्याच्या वैयक्तिक फॉर्मविषयी चर्चा केली.

“भारताच्या सध्याच्या गोलंदाजी फळीमध्ये वैविध्य आहे. खासकरुन वेगवान गोलंदाजी ताकदवान आणि खोल आहे. मी गेल्या दहा वर्षापासून भारता  विरुद्ध खेळत आहे. या दहा वर्षात भारतीय संघाकडे आजच्या येवढे चांगले वेगवान गोलंदाजांचे पर्याय नव्हते.” असे  कुक पत्रकार परिषदेत म्हणाला.

या पत्रकार परिषदेत कुकने पुढे भारतीय फलंदाजी विषयीसुद्धा आपले मत व्यक्त केले.

“आज भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल आहे, कारण त्यांच्या फलंदाजांनी गेल्या काही काळात सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे या कसोटी मालिकेत भारतीय फलंदाजांना रोखण्याचे आमच्यासमोर आव्हान असणार आहे.” असे माजी कर्णधार अॅलिस्टर कुक म्हणाला.

Loading...

“गेली तीन ते चार आठवडे मी क्रिकेटपासून दूर असल्याने मला पुरेशी  विश्रांती मिळाली आहे. त्यामुळे मला भारता विरुद्ध खेळण्यासाठी ताजेतवाने वाटत आहे. तसेचे इंग्लंड लायन्सकडून भारता विरुद्धच्या सराव सामन्यात केलेल्या १८० धावांमुळे माझ्यात चांगला आत्मविश्वास निर्माण झाला आहे.” आपल्या वैयक्तिक फॉर्मविषयी बोलताना कुक म्हणाला.

भारत-इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला १ ऑगस्टपासून सुरवात होत आहे.

Loading...

या मालिकेतील पहिला सामना बर्मिंघहमच्या एजबेस्टन मैदानावर खेळला जाणार आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या-

-मिसेस गायतोंडे आहे सेक्रेड गेम्समधील धोनीचं आवडत पात्र

-क्रिकेटमधील आरक्षणावरुन मोहम्मद कैफ संतापला

You might also like
Loading...