fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

बापरे! एकाच संघातील १६ खेळाडूंना कोरोनाची बाधा; क्रीडा जगत हादरले

मुंबई । कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. या खतरनाक महामारीने सर्वच क्रीडा स्पर्धा ठप्प आहेत. एरवी खेळाडूंनी गजबजलेली मैदानांना कुलूप लावल्याने सर्वत्र सामसूम वातावरण होते. कोरोनाच्या सावटाताच काही ठिकाणीची मैदाने सुरु झाली आहेत. यादरम्यान फुटबॉलच्या मैदानातून एक धक्कादायक बातमी पुढे आल्याने क्रीडा जगतात खळबळ माजली आहे.

एकाच संघातील 16 खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले आहे. ब्राझीलमधील फुटबॉल क्लब वास्को द गामा यांनी दिलेल्या माहितीनुसार, क्लबने 250  लोकांची कोरोना चाचणी केली असून त्यापैकी 16 जणांचे  अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

यातूनही एक सुखद बातमी आली आहे की, तीन खेळाडू कोरोनामुक्त झाले आहेत. तर उर्वरित लोकांना क्वारंटाइनमध्ये ठेवण्यात आले आहे. संघातील सर्व सदस्यांची सिलसिलेवार टेस्ट करण्यात येत असल्याचे क्लबने सांगितले. चीनच्या वुहान शहरातून कोरोना व्हायरसचा प्रथम रुग्ण आढळला. आता याचा प्रसार आता जगभर झाला आहे. जगात 55 लाखांपेक्षा जास्त लोकांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.

You might also like