कसोटी क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच आयोजित झालेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात २३ जून रोजी न्यूझीलंडने भारतीय संघाचा ८ गड्यांनी पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. भारताच्या या पराभवानंतर अनेक जण या पराभवाची मीमांसा करताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी या पराभवाबाबत महत्वपूर्ण विधान केले आहे.
पराभवाला फलंदाज जबाबदार
भारतीय निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी एका क्रिकेट वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटले, “आपण उत्कृष्ट संघ घेऊन मैदानात उतरलो होतो. मात्र, फलंदाजांमुळे आपण सामन्यात माघारलो. तरीही लोक गोलंदाजांना दोष देत आहेत. फलंदाजांनी ७०-८० धावा आधी काढल्या असता तर आपण सामना जिंकू शकलो असतो किंवा अनिर्णित राखू शकलो असता.”
भारतीय संघाने या सामन्यांमध्ये पहिल्या डावात फलंदाजी करताना केवळ २१७ धावा बनविल्या होत्या. त्यानंतर, न्यूझीलंडने पहिल्या डावात २४९ धावा बनवून ३२ धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली. भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावातही हाराकिरी करताना केवळ १७० धावांची मजल मारली. त्यानंतर, विजयासाठी मिळालेले १३९ भावांचे आव्हान इंग्लंडने आठ गडी राखून पार करत विजेतेपद आपल्या नावे केले.
भारतीय फलंदाजांचा फ्लॉप शो
या ऐतिहासिक सामन्यात भारतीय फलंदाज अपयशी ठरले. भारताच्या एकाही फलंदाजाला दोन्ही डावात अर्धशतक झळकावता आले नाही. रोहित शर्मा, विराट कोहली व अजिंक्य रहाणे हे महत्वपूर्ण खेळाडू चांगल्या सुरुवातीनंतर मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले. न्यूझीलंडसाठी सर्व वेगवान गोलंदाजांसह कर्णधार केन विलियम्सन, रॉस टेलर व डेवॉन कॉनवे यांनी फलंदाजीत उत्कृष्ट कामगिरी केली.
महत्त्वाच्या बातम्या –
‘चांगलं काम केले भावा’, केदार जाधवने ‘तो’ फोटो पोस्ट करताच वॉर्नरने थोपटली पाठ
काय सांगता? केवळ १० चेंडूत संपला होता ‘तो’ कसोटी सामना, कारण होते विचित्रच