---Advertisement---

विश्वचषकातून ‘आऊट’ झालेल्या महिला संघाची विराटकडून पाठराखण, ट्वीट वाचून कराल कौतुक

On: सोमवार, मार्च 28, 2022 3:09 PM
Mithali-Raj-Virat-Kohli
---Advertisement---

आयसीसी महिला वनडे विश्वचषक २०२२ ही स्पर्धा अंतिम चरणात पोहोचली आहे. या विश्वचषकातील २८ वा सामना रविवारी (२७ मार्च) भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात झाला. भारतीय संघासाठी ‘करा अथवा मरा’ अशी स्थिती असलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकाने ३ विकेट्स राखून विजय मिळवला आहे. त्यामुळे भारतीय संघाचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले आहे.

उपांत्य फेरीत पोहोचण्याच्या इतक्या नजीक येऊन भारतीय संघ शेवटी शर्यतीतून बाहेर (Indian Women Out Of World Cup) पडल्यानंतर क्रिकेटविश्वातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) यानेही महिला संघाबाबत प्रतिक्रिया दिली (Virat Kohli On Indian Women Team) आहे. विराटने विश्वचषकासारख्या मार्की स्पर्धेतील भारतीय महिला संघाच्या लढाऊ भावनेबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.

विराटने ट्वीट करत लिहिले आहे की, ‘जिंकण्याचे ध्येय असलेल्या स्पर्धेतून बाहेर पडणे नेहमीच कठीण असते, परंतु आमचा महिला संघ ताठ मानेने सर्वत्र वावरू शकतो. तुम्ही विश्वचषक जिंकण्यासाठी तुमचे सर्वश्रेष्ठ प्रयत्न केले आणि आम्हाला तुमचा अभिमान आहे.’  

नो बॉलमुळे पालटला सामना
दरम्यान भारतीय संघाने महत्वपूर्ण सामन्यात दक्षिण आफ्रिकेला बरोबरीची (INDW vs SAW) टक्कर दिली होती. भारताकडून सलामीवीर स्म्रीती मंधाना, शेफाली वर्मा आणि कर्णधार मिताली राज यांनी शानदार अर्धशतके केली होती. परंतु भारतीय फलंदाजांच्या जबरदस्त प्रदर्शनावर गोलंदाजांच्या खराब कामगिरीने पाणी फेरले. दक्षिण आफ्रिकेच्या संपूर्ण डावादरम्यान धावा खर्च केल्यानंतर शेवटच्या षटकात मोक्याच्या क्षणी नो बॉल टाकल्याने भारतीय संघाला ३ विकेट्सने हा सामना (SAW Beat INDW) गमवावा लागला.

भारतीय संघाचा विश्वचषकातील प्रवास
मिताली राजच्या नेतृत्त्वाखालील भारतीय संघाने पाकिस्तानवरील विजयासह विश्वचषक स्पर्धेची सुरुवात केली होती. मात्र त्यानंतर न्यूझीलंडने त्यांना ६२ धावांनी पराभवाची धूळ चारली. पुढे भारतीय संघाने वेस्ट इंडिजला १५५ धावांनी नमवत स्पर्धेत दमदार पुनरागमन केले होते. मात्र इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला पुन्हा बॅकफूटवर ढकलले. त्यानंतर बांगलादेशवर मोठा विजय मिळवत भारतीय संघाने उपांत्य फेरीतील आशा जिवंत ठेवल्या होत्या. परंतु दक्षिण आफ्रिकेने निर्णायक साखळी फेरी सामना जिंकत भारतीय संघाला उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर केले.

महत्त्वाच्या बातम्या-

अर्रर्र, लईच वाईट झालं! मुंबईचा कर्णधार रोहितला दुहेरी धक्का, पहिली मॅच पण हरली आणि दंडही झाला

बापरे! पंजाब-आरसीबी सामन्यात दोन्ही संघांनी दिल्या ‘एवढ्या’ एक्ट्रा धावा की, आयपीएलच्या इतिहासात झाली नोंद

‘परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन!’, पंजाबविरुद्ध २०५ धावा करूनही पराभव झाल्याने आरसीबी ट्रोल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---