पुढील महिन्यात भारतात होणाऱ्या टी-20 (ICC T20 international world cup 2026) विश्वचषकात खेळण्यास बांगलादेशने नकार दिला आहे. सुरक्षेचे कारण पुढे करत त्यांनी आपले सामने श्रीलंकेत हलवण्याची मागणी केली होती. मात्र, आयसीसीने वेळापत्रकात बदल करण्यास नकार दिल्यानंतर आणि 14-2 अशा बहुमताने बांगलादेशचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर, त्यांनी स्पर्धेतून माघार घेतली. परिणामी, आता बांगलादेशच्या जागी स्कॉटलंडचा समावेश करण्यात आला आहे.
1996 वर्ल्डकप – ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजची भीती: श्रीलंकेतील यादवी युद्ध आणि कोलंबोमधील बॉम्बस्फोटांमुळे ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजने तिथे खेळण्यास नकार दिला होता. भारत-पाकिस्तानने मैत्रीपूर्ण सामना खेळून पाठिंबा दर्शवला, तरीही हे दोन संघ गेले नाहीत. अखेर गुण बहाल केल्यामुळे श्रीलंकेला फायदा झाला आणि त्यांनीच ऑस्ट्रेलियाला हरवून विश्वचषक जिंकला.
2009 वर्ल्डकप – झिम्बाब्वेचा स्वाभिमान: इंग्लंडसोबतच्या राजकीय तणावामुळे झिम्बाब्वेच्या खेळाडूंना व्हिसा मिळण्यात अडचणी होत्या. “जिथे निमंत्रण नाही, तिथे जाणार नाही” अशी भूमिका घेत झिम्बाब्वेने स्पर्धेतून माघार घेतली. तेव्हा त्यांच्या जागी स्कॉटलंडला संधी मिळाली होती.
2016 वर्ल्डकप – ऑस्ट्रेलियाची भूमिका: 2015 मध्ये बांगलादेशमधील असुरक्षिततेमुळे ऑस्ट्रेलियाने तिथल्या मालिकेतून माघार घेतली होती. 2016 च्या विश्वचषकावेळीही त्यांनी आपली भूमिका बदलली नाही. परिणामी, ऑस्ट्रेलियाऐवजी आयर्लंडचा संघ मैदानात उतरला होता.
2025 चॅम्पियन्स ट्रॉफी – भारताचा ‘नो कॉम्प्रमाईज’ पॅटर्न: 29 वर्षांनंतर पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघाने तिकडे जाण्यास स्पष्ट नकार दिला. सुरक्षेच्या कारणास्तव सरकारने परवानगी नाकारल्याने बीसीसीआयने ही भूमिका घेतली. अखेर भारताचे सामने दुबईत (तटस्थ ठिकाणी) खेळवण्यात आले आणि टीम इंडियाने तिथे ऐतिहासिक जेतेपद पटकावले.






