इंग्लंडच्या वेन रुनीने काल बुधवारी आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधून निवृत्ती घेतली. इंग्लंडकडून खेळताना सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल ५३ करण्याच्या विक्रम रुनीच्या नावे आहे.
त्याच्या कारकिर्दीतील काही ठळक गोष्टींचा हा आढावा:
# पदार्पणात कारनामा-
वयाच्या ९ व्या वर्षी एव्हरटन क्लबच्या अकादमीत दाखल झालेल्या रुनीने १६ व्या वर्षी या क्लबच्या मुख्य संघासाठी खेळण्यास सुरुवात केली.२००४साली वयाच्या १७ व्या वर्षी रुनीने इंग्लंडसाठी पदार्पण केले. इंग्लंडसाठी सर्वात कमी वयात पदार्पण करणारा खेळाडू ठरला. २००४ च्या युरो चषकात त्याने कमाल केली. साखळी सामन्यात त्याने ४ गोल करत त्याने इंग्लंडला उपांत्यपूर्व सामन्यात पोहचवले. पोर्तुगाल विरुद्ध झालेल्या या सामन्यात त्याला जबर दुखापत झाली, त्यामुळे रुनी उर्वरित सामना खेळी शकला नाही. हा सामना इंग्लंडने पेनल्टीमध्ये गमावला.
# इंग्लंडवरील अतूट प्रेम-
नोव्हेंबरमध्ये स्कॉटलँड विरुद्ध झालेल्या विश्वचषकाच्या पात्रता फेरीच्या सामन्यानंतर रुनीने मध्यपान केले म्हणून त्याला टीकेचा धनी व्हावे लागले. खूप मोठा वाद या गोष्टीमुळे झाला. परंतु त्याच्या इंग्लंड विषयीच्या प्रेमाबद्दल कोणालाही शंका नाही.
वयाच्या १६ व्या वर्षी त्याचे आजोबा आयरिश असल्याने त्याला आयर्लंड देशाचे नागरिकत्व घेण्याबाबत विचारणा झाली. त्याने त्याबद्दल नकार दर्शविला होता. त्याला एक मुलाखतीत विचारले असता तो म्हणाला,” माझे आजी-आजोबा हे आयरिश होते. त्यामुळे मला त्या देशाकडून खेळता येणार होते पण मी . त्याचा विचार केला नाही. इंग्लिश आहे आणि असणार आहे.”
#इंग्लंडचा विक्रमवीर-
रुनीने युरो चषकात स्कॉटलँड विरुद्ध खेळताना विक्रमी ५३वा गोल केला.परंतु इंग्लंडने हा सामना २-१ असा गाववाला. त्यामुळे या स्पर्धेतील इंग्लंडचे आव्हान साखळी सामन्यातच संपुष्टात आले.यामुळे इंग्लंडचे प्रशिक्षक होडगसॉन याना राजीनामा द्यावा लागला. या सामन्यात रुनीने विक्रमी गोल केला जरी असला तरी त्याला बाकीच्या खेळाडूंकडून चांगला खेळ करवून घेता आला नाही. त्याने जो गोल केला होता तो देखील पेनल्टीवर केला होता.या सामन्यानंतर रुनीने आता थांबावे अशी चर्चा सुरु झाली होती.