---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेत दिसणार राजस्थान रॉयल्स 2.0! बटलर-मिलरसह हे चर्चित चेहरे पार्ल संघात

Rajasthan-Royals
---Advertisement---

पुढील वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत नवी टी२० लीग सुरू होणार आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाला या लीगपासून मोठ्या अपेक्षा आहेत. कारण, दक्षिण आफ्रिका क्रिकेटची विस्कटलेली आर्थिक घडी या लीगमूळे पुन्हा एकदा बसू शकते. आता शुक्रवारी (१२ ऑगस्ट) या नव्या टी२० लीगमधील राजस्थान रॉयल्सच्या मालकीच्या पार्ल फ्रॅंचाईजीने आपल्या संघाचे नवे नाव व करारबद्ध केलेल्या खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत.

आयपीएलच्या धर्तीवर आयोजित होत असलेल्या या लीगसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडणार आहे . लिलावापूर्वी प्रत्येक संघ पाच खेळाडूंना करारबद्ध करू शकतो. या पाचपैकी तीन खेळाडू विदेशी, एक दक्षिण आफ्रिकेचा आंतरराष्ट्रीय व एक अनकॅप्ड खेळाडू असेल. एका संघात १७ खेळाडू असणे आवश्यक आहे. या लीगमधील सर्वच्या सर्व सहा संघ आयपीएलच्या संघमालकांनी विकत घेतलेत. यामध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, सनरायझर्स हैदराबाद व लखनऊ सुपरजायंट्स यांचा समावेश आहे.

 

यापैकी पार्ल फ्रॅंचाईजी राजस्थान रॉयल्स संघाने खरेदी केली होती. शुक्रवारी राजस्थान रॉयल्सने आपल्या या नव्या फ्रॅंचाईजीचे नामकरण केले. आता ही फ्रॅंचाईजी पार्ल रॉयल्स नावाने ओळखली जाईल. त्याचवेळी संघाने आपण करारबद्ध केलेल्या खेळाडूंची नावे देखील जाहीर केली. यामध्ये राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल खेळणाऱ्या जोस बटलर, ओबेद मेकॉय व कॉर्बिन बॉश यांच्यासह दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार डेव्हिड मिलर यांना करारबद्ध केले आहे. मिलर यापूर्वी दोन वर्ष राजस्थान रॉयल्ससाठी खेळला आहे.

राजस्थान रॉयल्सच्या मालकीचा आणखी एक संघ बार्बाडोस रॉयल्स हा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळतो. त्या संघातही मिलर, मेकॉय व बॉश समाविष्ट आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! २०२३ मध्ये ‘या’ महिन्यात होणार महिला आयपीएलचे आयोजन

अल्टिमेट खो खो स्पर्धेच्या पहिल्या मौसमातून अनुभवायला मिळणार अस्सल ‘देशी खो खो’चे नव्या रूपात दर्शन

पंत कार्तिकच्या जागी ‘या’ खेळाडूला खेळू द्या! माजी दिग्गजानं बीसीसीआयला सुचवलाय नवा पर्याय

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---