गुजरात टायटन्स वि. चेन्नई सुपर किंग्स संघात आयपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना सोमवारी (दि. 29 मे) खेळला जात आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाचा आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. चेन्नईकडे सामन्याच्या दुसऱ्या षटकातच गुजरात टायटन्स संघाचा फलंदाज शुबमन गिल याची विकेट घेण्याची संधी होती. मात्र, संघाने संधी गमावली. दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर गिलला मोठे जीवदान मिळाले. तुषार देशपांडे यांच्या चेंडूवर दीपक चाहरने झेल सोडला. त्यावेळी गिलने फक्त एक धाव केली होती. आता चाहर चाहत्यांकडून जोरदार ट्रोल होत आहे.
दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर तुषार देशपांडे (Tushar Deshpande) याने गुड लेंथ चेंडू टाकला होता. पॅडवर येणारा चेंडू शुबमन गिल (Shubman Gill) याने बॅकवर्ड स्क्वेअर लेगवर खेळला, तिथे दीपक चाहर (Deepak Chahar) क्षेत्ररक्षण करत होता. झेल पकडण्यासाठी चाहरने दोन्ही हात पुढे केले, पण चेंडू हातावर लावून खाली पडला. झेल सोडल्यानंतर चाहरच्या चेहऱ्यावर निराशा स्पष्टपणे दिसत होती. आता हा झेल सोडल्यामुळे तो सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होत आहे.
एकाने ट्वीट करत लिहिले की, “दीपक चाहरने नुकताच गिलचा झेल सोडला. मागील सामन्यात टीम डेविडने गिलचा 30 धावांवर असताना झेल सोडला होता आणि आपण पाहिले की, त्याने जीवदानाचा कसा फायदा घेतला.”
Deepak Chahar just dropped Shubhman Gill. ???????? Tim David dropped Gill on 30 in the last match, and we all saw how he took that lifeline. #IPL2023Final #GTvsCSK #IPL2023 pic.twitter.com/hsey3tHwy8
— Ridhima Pathak (@PathakRidhima) May 29, 2023
दुसऱ्या एकाने ट्वीट करत लिहिले की, “दीपक चाहर आशा करत असेल की, शुबमन गिल लवकर बाद होईल.”
Deepak Chahar will be hoping Shubman Gill gets dismissed very soon…#IPLFinal pic.twitter.com/nhClnC8h2A
— CricBlog ✍ (@cric_blog) May 29, 2023
आणखी एकाने मीम शेअर करत ट्वीट केले की, “भारी मिस्टेक हो गया एकदम बलंडर हो गया.”
Deepak chahar Right now ???? pic.twitter.com/zI9rgxocS4
— An$hu ॐ (@haramii_balak12) May 29, 2023
एकाने असेही ट्वीट केले की, “दीपक चाहरने झेल सोडला नाहीये, त्याने ट्रॉफी सोडली आहे.”
That was not catch drop by Deepak Chahar, that was trophy drop !
— ᴍʀ.ᴠɪʟʟᴀ..!???? (@TuJoMilaa) May 29, 2023
खरं तर, यापूर्वी मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) याचा 30 धावांवर टीम डेविड याने झेल सोडला होता. त्यानंतर त्या सामन्यात शुबमन गिल याने शतक ठोकले होते. आता सोशल मीडियावर चाहरला जोरदार ट्रोल केले जात आहे.
गुजरातचा डाव
या सामन्यात शुबमन गिल याने 20 चेंडूत 39 धावा केल्या. यामध्ये त्याने 7 चौकार मारले. त्याला रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने त्यलाा धोनीच्या हातून झेलबाद केले. गिलने पहिल्या विकेटसाठी वृद्धिमान साहासोबत 67 धावांची भागीदारी रचली. त्याच्यानंतर गुजरातसाठी साई सुदर्शन याने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 47 चेंडूत 96 धावा केल्या. त्याच्या खेळीच्या जोरावर गुजरातने 20 षटकात 4 विकेट्स गमावत 214 धावा केल्या. सुदर्शनव्यतिरिक्त सलामीवीर वृद्धिमान साहा याने 54 धावा करत अर्धशतक साकारले.
यावेळी चेन्नई सुपर किंग्सकडून गोलंदाजी करताना मथीशा पथिराना याने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. त्याने 4 षटके गोलंदाजी करताना 44 धावा खर्च करत 2 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त दीपक चाहर आणि रवींद्र जडेजा याने प्रत्येकी 1 विकेट नावावर घेतली. (pacer deepak chahar drop shubman gill catch in ipl 2023 final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
वय झालं तरी चित्त्याची चपळाई कमी होत नसते! गिलला यष्टीचित करणाऱ्या धोनीवर कौतुकाचा वर्षाव, बघा तो Video
जेव्हाही IPL इतिहासाची पाने पाहिली जातील, तेव्हा ‘या’ विक्रमात धोनीच दिसेल ‘टॉपर’, पाहा रेकॉर्ड