---Advertisement---

‘शोमॅन’ गिलने केले ऋतुच्या विक्रमावर ‘राज’! 16 वर्षांच्या आयपीएल इतिहासात ठरला नंबर वन

---Advertisement---

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगलेल्या आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स व चेन्नई सुपर किंग्स आमने-सामने आले होते. या सामन्यात गुजरातचा युवा सलामीवीर शुबमन गिल याच्यावर सर्वांची नजर होती. यापूर्वीच ऑरेंज कॅप आपल्या नावे केलेल्या गिलने या डावातही 39 धावांचे योगदान दिले. यासह सर्वात कमी वयात ऑरेंज कॅप पटकावणारा खेळाडू होण्याचा मान त्याने मिळवला.

संपूर्ण हंगामात शानदार खेळ दाखवणाऱ्या गिलने या सामन्यात संथ सुरुवात केली. त्याला चार धावांवर दीपक चहरने सोपे जीवदान दिले. यावेळी गिलने 20 चेंडूत 39 धावा केल्या. या धावा करताना त्याने 7 चौकार मारले. एमएस धोनीने चलाखी दाखवत त्याला यष्टिचित करून तंबूचा रस्ता दाखवला.

शुबमन गिल आयपीएल 2023 हंगामात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला. त्याने 17 सामने खेळताना 59.33 च्या शानदार सरासरीने आणि 157.80 च्या धमाकेदार स्ट्राईक रेटने सर्वाधिक 890 धावा केल्या. या धावा करताना त्याने 3 शतके झळकावली. तसेच, 4 अर्धशतकेही पूर्ण केली. मुंबईविरुद्ध केलेली 129 धावांची खेळी ही त्याची हंगामातील सर्वोत्तम धावसंख्या आहे.

गिल यासह आयपीएल इतिहासात सर्वात कमी वयात ऑरेंज कॅप जिंकणारा खेळाडू बनला. त्याने 23 वर्ष व 263 दिवसांत ही कामगिरी केली. यापूर्वी हा विक्रम चेन्नईच्या ऋतुराज गायकवाड याच्या नावे होता. त्याने 2021 मध्ये 24 वर्ष 258 दिवसांच्या वयात ऑरेंज कॅप आपल्या नावे केली होती. तर पहिल्या हंगामात शॉन मार्शने पंजाबसाठी 24 वर्ष 350 दिवसांचा असताना हा कारनामा केला होता.

(Shubman Gill becomes the youngest player in history to win the Orange Cap Pass Ruturaj Gaikwad)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हंगामात तब्बल ‘इतक्या’ धावा कुटत शुबमन गिल ठरला ‘घाटाचा राजा’! विराटचा ‘तो’ विक्रम मात्र अबाधित
फायनलपूर्वी आली मोठी बातमी! CSKच्या खेळाडूंना पैशांचं आमिष दाखवतो ‘हा’ खेळाडू, स्वत:च केला खुलासा  

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---