जवळपास मागील ३ महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर असलेल्या दीपक चाहरबाबत आनंदाची बातमी येत आहे. चाहर आता मैदानावर परतला असून त्याने सरावाला सुरुवात केली आहे. २९ वर्षीय चाहरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून नेट्समध्ये सराव करतानाचा व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे. यासोबतच त्याने एक कॅप्शनही दिले आहे. काय आहे नेमकं त्याचं कॅप्शन चला तर जाणून घेऊया…
दीपक चाहर (Deepak Chahar) याने शेअर केलेल्या व्हिडिओत चाहर सरावादरम्यान गोलंदाजी करताना दिसत आहे. चाहरने ही स्टोरी शेअर करत कॅप्शनमध्ये “पुन्हा लहान पावलं,” असे लिहिले आहे. त्याने आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना २० जानेवारी रोजी वेस्टइंडिजविरुद्ध टी२० सामना खेळला होता. या सामन्यादरम्यान त्याला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. विशेष म्हणजे, पाठीच्या दुखण्यामुळे त्याला नुकत्याच पार पडलेल्या आयपीएल २०२२मधूनही बाहेर पडावे लागले होते.
चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघाने आयपीएल २०२२च्या मेगा लिलावात चाहरला १४ कोटी रुपयांमध्ये संघात सामील केले होते. इतकेच नाही, तर चाहर आता मायदेशात होणाऱ्या ५ सामन्यांच्या टी२० मालिकेतही खेळू शकणार नाही. आता लवकरात लवकर तंदुरूस्त होऊन आगामी विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याचे चाहरचे लक्ष्य असेल.
दुखापतीतून बाहेर येण्यासाठी चाहरने बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (National Cricket Academy) म्हणजेच एनसीए (NCA) येथे सराव केला. यादरम्यान त्याने १ जून रोजी आग्रा येथे गर्लफ्रेंड जया भारद्वाज हिच्याशी लग्नही केले. आपल्या लग्नाच्या ७ दिवसानंतर चाहरने नेट्समध्ये पुनरागमन केले आणि जोरदार मेहनत करताना दिसला.
चाहरची कारकीर्द
दीपक चाहर याने त्याच्या कारकीर्दीत २० आंतरराष्ट्रीय टी२० सामने आणि ७ वनडे सामने खेळले आहेत. टी२०त त्याच्या नावावर २६ विकेट्स आहेत. दुसरीकडे, वनडेत त्याने १० विकेट्स घेण्याची किमया केली आहे.
याव्यतिरिक्त फलंदाजी करताना त्याने टी२०त फक्त २२ धावा केल्या आहेत, तर दुसरीकडे वनडेत त्याने १७९ धावा चोपल्या आहेत. यामध्ये त्याने २ अर्धशतकेही झळकावली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘या’ पाकिस्तानी खेळाडूची मुलगी रुग्णालयात देतेय मृत्यूशी झुंज
ऐकलंत का! पाकिस्तानच्या माजी कर्णधारालाही आहे विराटवर विश्वास; म्हणतोय, ‘तो क्रिकेटच्या भल्यासाठी…’
मितालीला आवडतात ‘हे’ पुरुष क्रिकेटपटू, सोशल मीडियावर केलं होतं जाहीर