भारतात कोविड-१९ या महामारीचा विळखा पडला आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी भारतभर लसीकरणही सुरु आहे. सध्या देशात वयवर्ष १८ च्या पुढील लसीकरण सुरु झाले आहे. त्यामुळे सोमवारी (१० मे) भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्मा याने कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे. सोबतच त्याची पत्नी प्रतिमा सिंग हिनेही लस घेतली आहे. याबद्दल इशांतने स्वत: सोशल मीडियाद्वारे माहिती दिली आहे.
इशांतने आपला व पत्नी प्रतिमाचा लसीकरण क्रेंदाबाहेरचा फोटो शेअर केला आहे. यावर कॅप्शन देत त्याने लिहिले आहे की, ‘कोरोनाची लस टोचून घेतली. कोरोना लसीकरणाशी संबंधित आवश्यक कार्यकत्यांचा आभारी आहे. त्यांच्या सर्व सोईसुविधा आणि व्यवस्थापन पाहून चांगले वाटले. सर्वांनी लवकरात लवकर कोरोनाची लस घ्या.’
Thankful for this and grateful for all the essential workers. Happy to see the smooth running of the facility & management.
Let’s all get vaccinated at the earliest. #GetVaccinated #CovidVaccine pic.twitter.com/3wRHeBwvTP
— Ishant Sharma (@ImIshant) May 10, 2021
इशांत आणि प्रतिमापुर्वी भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका रहाणे यांनीही एकसोबत जाऊन कोरोनाची लस घेतली होती.
इशांत शर्माला आयपीएल २०२१ मध्ये विशेष कामगिरी करता आली नाही. दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला या हंगामात अवघे ३ सामने खेळण्याची संधी दिली. दरम्यान तो केवळ एक विकेट घेऊ शकला. जर इशांतच्या संपूर्ण आयपीएल कारकिर्दीविषयी बोलायचे झाले तर, त्याने २००८ पासून ते आतापर्यंत ९३ आयपीएल सामने खेळले आहेत. दरम्यान ७३ विकेट्सची आपल्या नावे नोंद केली आहे. यात १२ धावांवर ५ विकेट्स या सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरीचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लग्नाआधीच केकेआरच्या ‘या’ शिलेदाराच्या घरी हालणार पाळणा, लवकरचं बनणार ‘बापमाणूस’
ओहो! कोणाचीही फिकीर न करता राहुल तेवतियाचा खुल्लम खुल्ला प्रपोजल, पाहा तो भारी क्षण
‘या’ भारतीय क्रिकेटपटूंचा थाटच न्यारा, कोट्याधीश नव्हे तर चक्क अब्जाधीशांच्या घरचे आहेत लाडके जावई