यावर्षी 5 ऑक्टोबरपासून वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेला सुरुवात होणार आहे. यापूर्वी भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. आयर्लंडनंतर भारतीय संघाला आशिया चषक 2023 स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. अशात आयर्लंड दौऱ्यावरील भारताचे प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या मते, जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्णा यांना विश्वचषकापूर्वी जास्त सामने खेळण्याची संधी दिली गेली पाहिजे होती. बुमराह आणि प्रसिद्ध नुकतेच भारतीय संघात परतले आहेत.
आघाडीच्या क्रिकेट वेबसाईटनुसार, सितांशू कोटक (Sitanshu Kotak) यांनी जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna) यांच्याविषयी भाष्य केले. ते म्हणाले की, “मला वाटत नाही की, दोघांवर कोणताही दबाव आहे. या दोघांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत खूपच मेहनत घेतली आहे. या दोघांना पाहून तुम्ही हे म्हणू शकत नाहीत की, हे दीर्घ काळापासून मैदानापासून दूर राहिले आहेत. ते सरावादरम्यानही पूर्णपणे तयार असल्याचे दिसले होते. मात्र, असे असूनही विश्वचषकापूर्वी त्यांना सामने खेळवण्याची गरज आहे. या मालिकेनंतर ते आशिया चषकात खेळतील.”
कोटक पुढे बोलताना म्हणाले की, “मी आधीही भारतीय संघासोबत जोडला गेलो आहे. मात्र, ही पहिली वेळ आहे, जेव्हा मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी मिळाली आहे. राहुल द्रविड आणि त्याचा संघ आशिया चषकासाठी तयार होत आहे. मी 2019पासून अ संघासोबत काम करत आलो आहे. बुमराह आणि प्रसिद्धसोबतच इतर खेळाडूही माझ्या ओळखीचे आहेत.”
खरं तर, बुमराह आणि प्रसिद्ध दीर्घ काळापासून भारतीय संघातून बाहेर होते. बुमराह फिट झाल्यानंतर आयर्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी निवडला गेला. त्याच्या खांद्यावर नेतृत्वाची जबाबदारीही टाकली गेली. प्रसिद्धही या मालिकेसाठी भारतीय संघात सामील आहे. बुमराह आणि प्रसिद्ध जोडी या मालिकेत चांगली कामगिरी करताना दिसत आहे. हे दोन्ही खेळाडू भारतासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. (pacer jasprit bumrah prasidh krishna needs more matches before world cup 2023 said indian coach)
हेही वाचा-
शंभर चेंडूंच्या लीगमध्ये फलंदाज बनला रिंकू सिंग; 5 चेंडूत ठोकले 5 जबरदस्त षटकार, पाहा व्हिडिओ
US Master T10 League: गंभीर अन् रैना सुपरफ्लॉप, हरभजन सिंगच्या संघाचा दणदणीत विजय