---Advertisement---

अर्रर्र! बुमराहच्या Insta Storyने माजवली खळबळ, मुंबईला केलं अनफॉलो; RCB संघात जाणार का? चाहतेही गोंधळात

On: मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023 1:51 PM
Jasprit-Bumrah-And-Virat-Kohli
---Advertisement---

Jasprit Bumrah IPL 2024: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषक 2023 स्पर्धेत चांगलाच चमकला होता. अनेक महिने क्रिकेटपासून दूर राहणाऱ्या बुमराहने आशिया चषक 2023मध्ये दमदार पुनरागमन केले. हाच फॉर्म त्याने विश्वचषकातही कायम ठेवला. त्याने संघाला जवळपास सर्वच सामन्यांमध्ये चेंडूने शानदार सुरुवात करून देण्याचे काम केले. त्याने स्पर्धेत एकूण 20 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, विश्वचषकाला 10 दिवस उलटल्यानंतर आता जसप्रीत बुमराह इंस्टा स्टोरी शेअर केल्यामुळे चर्चेत आला आहे.

बुमराहची इंस्टा पोस्ट
आयपीएल 2024 (IPL 2024) स्पर्धेच्या मिनी लिलावापूर्वी खेळाडूंना ट्रेड केले जात आहे. अलीकडेच गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाचा कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) ट्रेड होऊन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात परतला आहे. हार्दिक आपला पहिला संघ असलेल्या मुंबई इंडियन्समध्ये परतल्यामुळे खूपच खुश आहे. मात्र, पंड्या मुंबईत आल्यानंतर जसप्रीत बुमराहची इंस्टा स्टोरी (Jasprit Bumrah’s Insta Story) जोरात व्हायरल होत आहे.

बुमराह कुठल्या संघाचा धरणार हात?
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर केली आहे. त्यात त्याने लिहिले आहे की, “शांतता, हे सर्वात चांगले उत्तर असते.” बुमराहच्या या स्टोरीचा चाहते वेगवेगळा अर्थ लावत आहेत. काही चाहत्यांच्या मते, पंड्या मुंबईत आल्याने बुमराह खुश नाहीये. अशात बुमराहदेखील ट्रेड होऊन रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघात जाऊ शकतो. हैराण करणारी बाब म्हणजे, बुमराहने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघालाही अनफॉलो (Jasprit Bumrah Unfollows Mumbai Indians) केले आहे.

https://twitter.com/BrokenCricket/status/1729384761565892954

काय आहे स्टोरीमागील सत्य?
काही चाहत्यांच्या मते, जसप्रीत बुमराहने ही स्टोरी विश्वचषकात मिळालेल्या पराभवाचे दु:ख कमी करण्यासाठी केली आहे. बुमराहने विश्वचषकाच्या अंतिम सामन्याच्या जवळपास 10 दिवसांनंतर ही स्टोरी शेअर केली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात मिळालेल्या पराभवानंतर बुमराह शांत होता. आता त्याच्या स्टोरीवरून अंदाज लावला जात आहे की, तो पराभवामुळे निराश आहे.

https://twitter.com/halat_tere/status/1729391980457955453?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1729391980457955453%7Ctwgr%5Ec79b56d05195fde06d3d367aa4d7b5677502780a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.oneindia.com%2Fnews%2Fsports%2Fcricket%2Fjasprit-bumrah-reveals-why-he-didnt-say-anything-after-losing-the-world-cup-fans-reaction-viral-852335.html

https://twitter.com/AmarSinghAS_/status/1729391941333537212?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1729391941333537212%7Ctwgr%5Ec79b56d05195fde06d3d367aa4d7b5677502780a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.oneindia.com%2Fnews%2Fsports%2Fcricket%2Fjasprit-bumrah-reveals-why-he-didnt-say-anything-after-losing-the-world-cup-fans-reaction-viral-852335.html

https://twitter.com/jay_thakkar19/status/1729391872341373117?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1729391872341373117%7Ctwgr%5Ec79b56d05195fde06d3d367aa4d7b5677502780a%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.oneindia.com%2Fnews%2Fsports%2Fcricket%2Fjasprit-bumrah-reveals-why-he-didnt-say-anything-after-losing-the-world-cup-fans-reaction-viral-852335.html

मुंबईचा महत्त्वाचा भाग
सोशल मीडियावर अनेक ट्वीट व्हायरल होत आहेत, ज्यात जसप्रीत बुमराह आरसीबी (Jasprit Bumrah RCB) संघात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अधिकृतरीत्या ही माहिती समोर आली नाहीये. बुमराह हा मुंबई इंडियन्स संघाचा महत्त्वाचा भाग आहे. तो पदार्पणाच्या आयपीएल 2013 हंगामापासून संघाचा भाग राहिला आहे. तसेच, तो संघाचा भाग असताना मुंबईने 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 या 5 हंगामाचा किताबही जिंकला आहे. अशात बुमराहसारखा दिग्गज खेळाडू ट्रेड होऊन दुसऱ्या संघात जाण्याची शक्यता कमी आहे. (pacer jasprit bumrah reveals why he didnt say anything after losing the world cup fans reaction viral)

हेही वाचा-
भारताकडून सलग 2 सामने हारताच ऑस्ट्रेलिया संघात 6 धक्कादायक बदल, मॅक्सवेलसह ‘हे’ वर्ल्डकप स्टार परतणार मायदेशी
मरतानाही विश्वविजेता कर्णधार कमिन्स काढणार विराटच्या विकेटची आठवण, स्वत:च केलाय खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---