---Advertisement---

‘मला कसलाही पश्चाताप नाही, उलट…’, 24.75 कोटींची बोली लागलेल्या स्टार्कचे 8 IPL हंगाम न खेळण्याविषयी भाष्य

Mitchell-Starc
---Advertisement---

Mitchell Starc On IPL: ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आयपीएल 2024 लिलावात सर्वाधिक किंमतीत विकला गेला. त्याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने 24.75 कोटी रुपयांना ताफ्यात घेतले. अशाप्रकारे तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. विशेष म्हणजे, स्टार्क सलग मागील 8 हंगाम खेळला नव्हता. याच विषयी आता स्टार्कने मोठे विधान केले आहे.

काय म्हणाला स्टार्क?
मिचेल स्टार्क (Mitchell Starc) याने मागील सलग 8 वर्षे आयपीएल (IPL) न खेळण्याविषयी बोलताना म्हटले की, त्याला याचा कोणताही पश्चाताप नाहीये. स्टार्कनुसार, त्याने काही निर्णय घेतले होते आणि आता याचे त्याला कोणतेही दु:ख नाहीये. कारण, यामुळे त्याला आपली कसोटी कारकीर्द पुढे नेण्यात मदत झाली.

विलो टाक पॉडकास्टशी बोलताना स्टार्कने आयपीएलच्या 8 हंगामात न खेळण्याविषयी भाष्य केले. तो म्हणाला, “मी काही निर्णय घेतले होते, ज्याचा मला कोणताही पश्चाताप नाहीये. मला तर असे वाटते की, मला माझी कसोटी क्रिकेट कारकीर्द दीर्घ करण्यात मदत मिळाली. त्यामुळे मी खूप खुश आहे. ज्याप्रकारे गोष्टी आता गेल्या घडल्या, मी आभारी आहे की, लिलावात माझ्यासाठी इतकी महागडी बोली लागली आणि मी खूप हैराणही आहे.”

खरं तर, कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याने मिचेल स्टार्क याच्यासाठी 24 कोटींहून अधिक रुपयांची बोली लावण्याविषयी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. गंभीरने हा निर्णय योग्य असल्याचे म्हटले आहे. त्याने म्हटले की, स्टार्क एक्स फॅक्टर गोलंदाज आहे आणि तो संघाच्या गोलंदाजी आक्रमणाचे नेतृत्व करेल. तसेच, संघातील गोलंदाजांना त्याच्यामुळे खूप फायदा होईल.

स्टार्कची आयपीएल कारकीर्द
मिचेल स्टार्क याच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर तो 2014 आणि 2015 या दोनच हंगामात खेळला. यादरम्यान तो रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा भाग होता. त्यानंतर त्याने आयपीएलच्या कोणत्याच हंगामात भाग घेतला नव्हता. मात्र, तो आता पुन्हा एकदा आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे.

दोन आयपीएल हंगामात त्याने 27 सामने खेळताना 34 विकेट्स नावावर केल्या होत्या. यावेळी त्याने 1 वेळा एका डावात 4 विकेट्सही घेतल्या होत्या. 15 धावा खर्चून 4 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे. (pacer mitchell starc reacts on missing 8 consecutive ipl seasons)

हेही वाचा-
Breaking: IPL लिलावात RCBमध्ये सामील झालेल्या स्टार खेळाडूवर 4 सामन्यांची बंदी, टी20 लीगमध्ये केली मोठी चूक
‘तुमचा माझ्यावर विश्वास…’, चुकून खरेदी झालेल्या खेळाडूचा पंजाब किंग्सला रिप्लाय, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---