Tom Curran Suspended For 4 Matches: क्रिकेट विश्वातून एकापोठापाठ एक खळबळजनक बातम्या समोर येत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सिडनी सिक्सर्स संघाकडून खेळत असलेला इंग्लंडचा अष्टपैलू टॉम करनवर 4 सामन्यांची बंदी घातली आहे. बिग बॅश लीग 2023-24 स्पर्धेतील एका सामन्यादरम्यान अंपायरला घाबरवण्याच्या आरोपात करनवर ही कारवाई करण्यात आली आहे. या बातमीची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
बिग बॅश लीग 2023-24 (Big Bash League 2023-24) स्पर्धेतील 11व्या सामन्यात ही घटना घडली. या सामन्यात होबार्ट हरिकेन्स विरुद्ध सिडनी सिक्सर्स (Hobart Hurricanes vs Sydney Sixers) आमने-सामने होते. मात्र, सिक्सर्सने या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा निर्णय घेतला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काय म्हटले?
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्यांच्या निवेदनात म्हटले की, “करन लेव्हल-2 गुन्ह्यासाठी दोषी आढळला होता. या श्रेणीत पंच, सामना अधिकाऱ्यांना भाषा किंवा आचरणाद्वारे (हावभावांसह) घाबरवण्याचा किंवा भीती दाखवण्याचा प्रयत्न करण्याचा समावेश आहे.”
करनची कामगिरी
टॉम करन याने सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) संघाकडून बीबीएल 2023 (BBL 2023) स्पर्धेत फक्त 2 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 8 षटके गोलंदाजी करताना 48 धावा खर्चत 14च्या सरासरीने 3 विकेट्स घेतल्या आहेत.
आयपीएलमध्ये बेस प्राईजमध्ये आरसीबीचा भाग
खरं तर, इंडियन प्रीमिअर लीग 2024 हंगामासाठीच्या लिलाव 19 नोव्हेंबर रोजी दुबई येथे पार पडला. या लिलावात एकापेक्षा एक खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यातील बरेच खेळाडूंना बेस प्राईजच्या दुप्पट-तिप्पट रक्कम मिळाली, तर काही खेळाडूंना बेस प्राईजमध्येच खरेदी केले गेले. या खेळाडूंमध्ये टॉम करन याच्या नावाचाही समावेश होता. करनला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाने 1.50 कोटी रुपयांच्या बेस प्राईजमध्ये आपल्या संघाचा भाग बनवले.
विशेष म्हणजे, टॉमचा भाऊ सॅम करन (Sam Curran) हा आयपीएलमध्ये पंजाब किंग्स संघाचा भाग आहे. त्याला आयपीएल 2023मध्ये पंजाबने सर्वाधिक 18.50 कोटी रुपये मिळाले होते. त्यावेळी तो आयपीएल लिलावाच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. (big news tom curran suspended for 4 bbl matches for intimidating an umpire read)
हेही वाचा-
‘तुमचा माझ्यावर विश्वास…’, चुकून खरेदी झालेल्या खेळाडूचा पंजाब किंग्सला रिप्लाय, पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
‘धोनीने ज्याला मागितले, त्याला आम्ही विकत घेतले’, सीएसकेच्या सीईओची लिलावानंतर प्रतिक्रिया






