ILT20, Naveen Ul Haq Banned For 20 Months: मागील काही काळापासून क्रिकेटविश्वात चर्चेत असलेला अफगाणिस्तान संघाचा वेगवान गोलंदाज नवीन उल हक अडचणीत सापडला आहे. नवीनविषयी धक्कादायक बातमी समोर येत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, नवीन उल हकवर इंटरनॅशनल लीग टी20 स्पर्धेतून 20 महिन्यांची बंदी घातली गेली आहे. त्याने कराराचे उल्लंघन केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
क्रिकट्रॅकरच्या वृत्तानुसार, वेगवान गोलंदाज नवीन उल हक (Naveen Ul Haq) याने इंटरनॅशनल लीग टी20 (International League T20) स्पर्धेतील फ्रँचायझी शारजाह वॉरियर्स (Shahjah Warriors) संघासोबत खेळाडू कराराचा भंग (Breach of Contract) केला. त्याला शारजाहने स्पर्धेच्या पहिल्या हंगामासाठी करारबद्ध केले होते. यानंतर फ्रँचायझीने नवीनला आणखी एका वर्षाच्या मुदतवाढीची ऑफर दिली होती. मात्र, त्याने दुसऱ्या हंगामाच्या रिटेन्शन नोटीसवर सही करण्यास नकार दिला.
Breaking: Naveen Ul Haq has been banned for 20 months from participation in International League T20 due to breach of contract – via CricTracker ❌
He has been picked by Peshawar Zalmi in the PSL 👀 #PSL9 #PSL2024 pic.twitter.com/qcvKlPmrrY
— Farid Khan (@_FaridKhan) December 18, 2023
अशात नवीनवर मोठी कारवाई करण्यात आली असून तो पुढील 20 महिने (Naveen Ul Haq Banned for 20 Months from ILT20 League) या स्पर्धेत खेळताना दिसणार नाही. नवीन हा आयएलटी20 (ILT20) स्पर्धेच्या पहिल्या हंगामात (जानेवारी-फेब्रुवारी 2023) शारजाह वॉरियर्सकडून खेळला होता. वॉरियर्सने या वर्षाच्या सुरुवातीला त्याला खेळाडू कराराच्या अटींनुसार त्याच अटी व शर्तींवर कायम ठेवण्याची नोटीस पाठवली.
नवीनचे स्पर्धेतील प्रदर्शन
नवीन उल हक याने इंटरनॅशनल लीग टी20 स्पर्धेच्या 2023 हंगामात शारजाह वॉरियर्स संघाकडून एकूण 8 सामने खेळले. यादरम्यान त्याने 32.2 षटके गोलंदाजी केली. यावेळी त्याने 24.36च्या सरासरीने आणि 8.29च्या इकॉनॉमी रेटने 11 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे, यादरम्यान त्याने 1 वेळा डावात 5 विकेट्सही घेतल्या. नवीनने 38 धावा खर्चून 5 विकेट्स ही त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी ठरली.
नवीनची कारकीर्द
नवीनने अफगाणिस्तानकडून 15 कसोटी वनडे आणि 27 टी20 सामने खेळले आहेत. वनडेत त्याने 6.14च्या इकॉनॉमीने 22 विकेट्स, तर टी20त 8.10च्या इकॉनॉमी रेटने 34 विकेट्स घेतल्या आहेत. (pacer Naveen-ul-Haq has been banned for 20 months from participation in ILT20 due to breach of contract)
हेही वाचा-
IPL 2024 Auction: अश्विनची भविष्यवाणी! ‘या’ 2 खेळाडूंवर लागेल 14 कोटींपेक्षा जास्तीची बोली, घ्या जाणून
Sachin Tendulkar: वडिलांच्या जन्मदिनी सचिनची काळजाला भिडणारी पोस्ट; म्हणाला, ‘माझे वडील नेहमीच…’