Sachin Ramesh Tendulkar Post: क्रिकेट जगतात आपला ठसा उटवण्याचे धाडस खूप खेळाडू करतात. त्या दिग्गज खेळाडूंमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर याच्या नावाचाही समावेश होतो. कदाचित असा कोणताही विक्रम नसेल, जो सचिन तेंडुलकर याने केला नसेल. क्रिकेटमधील सर्वाधिक विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. त्याने 100 आंतरराष्ट्रीय शतकांचाही अद्वितीय विक्रम केला आहे. सचिन आता क्रिकेटपासून दूर असला, तरीही तो त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमीच चर्चेत असतो. अशातच 18 डिसेंबर हा सचिनसाठी खूपच खास दिवस आहे. यानिमित्त त्याने खास पोस्टही शेअर केली आहे.
सचिन तेंडुलकर 18 डिसेंबर
सचिन तेंडुलकर याच्यासाठी 18 डिसेंबर (Sachin Tendulkar 18th December) ही तारीख दोन कारणांमुळे खूपच खास आहे. यातील पहिले कारण असे की, 18 डिसेंबर हा सचिनच्या वडिलांचा म्हणजेच रमेश तेंडुलकर (Ramesh Tendulkar) यांचा जन्मदिवस आहे. या खास दिवसानिमित्त सचिनने काळजाला भिडणारी पोस्ट लिहिली आहे.
सचिन तेंडुलकरची ट्विटर पोस्ट
सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याने आपल्या वडिलांच्या जन्मदिनानिमित्त एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) वडिलांसोबतचा जुना फोटो पोस्ट केला आहे. यासोबतच त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “माझे वडील नेहमीच खूप काळजी करत होते, पण ते कधीच कठोर नव्हते. त्यांनी मला माझ्या आयुष्यात काय करायचे आहे, ते निवडू दिले. तसेच, मला माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी बिनशर्त पाठिंबा दिल. मला वाटते की, त्यांनी ज्याप्रकारे त्यांच्या लहान मुलांना वाढवले, नेहमीच आम्हाला प्रेम आणि स्वातंत्र्य दिले. हा पालकांसाठी सर्वात चांगला धडा आहे. ते काळाच्या पुढचा विचार करणारे होते. तसेच, त्या लाखो कारणांपैकी एकामुळे मी त्यांच्यावर खूप प्रेम करतो. त्यांच्यामुळेच मी आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बाबा. मी तुमची दररोज आठवण काढतो.”
My father was always caring but never strict. He let me choose what I wanted to do in life and supported me unconditionally in my quest to achieve my dreams. I think the way he raised all his children–always giving us love and freedom–is an excellent lesson in parenting. His… pic.twitter.com/b1qumJnuNO
— Sachin Tendulkar (@sachin_rt) December 18, 2023
दुसरे कारण?
तसेच, 18 डिसेंबर (18th December) या दिवसाचे आणखी एक खास कारण म्हणजे, हा सचिनचा वनडे पदार्पणाचा दिवस आहे. त्याने 18 डिसेंबर, 1989 रोजी पाकिस्तानविरुद्ध वनडे पदार्पण केले होते. सचिनने वनडे क्रिकेटमध्ये पुढे जे केले, तो इतिहास आहे. तो आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. त्याने वनडे क्रिकेटमध्ये 463 सामने खेळताना 452 डावात 44.83च्या सरासरीने 18426 धावा केल्या आहेत. यामध्ये 49 शतके आणि 96 अर्धशतकांचाही समावेश आहे. नाबाद 200 ही त्याची वनडेतील सर्वोत्तम धावसंख्या राहिली आहे. सचिनने भारतीय संघासाठी अखेरचा वनडे सामनाही पाकिस्तानविरुद्धच मीरपूर येथे 18 मार्च, 2012 रोजी खेळला होता. (sachin tendulkar special post on his father ramesh tendulkar’s birth anniversary)
हेही वाचा-
विराट आणि गंभीरमध्ये सर्वात Aggressive कोण? माजी भारतीय खेळाडू म्हणतो, ‘तो जरा जास्तच…’
IPL 2024 लिलावात इतिहास घडवण्यासाठी सज्ज असलेली Mallika Sagar आहे तरी कोण? जाणून घ्या सर्वकाही






