वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात न्यूझीलंड क्रिकेट संघाशी असलेला करारातून बाहेर पडला होता. कारण, बोल्टला कुटुंबासोबत अधिक वेळ घालवता येईल आणि जगभरातील फ्रँचायझी क्रिकेटमध्ये सहभाग घेता येईल. मात्र, आता त्याने करारातून बाहेर राहण्याचा निर्णय घेतला असला, तरीही यावर्षीच्या अखेरीस भारतात होणाऱ्या वनडे विश्वचषक 2023मध्ये आपल्या राष्ट्रीय संघाचा भाग बनण्याची त्याची अशी इच्छा आहे.
ट्रेंट बोल्ट (Trent Boult) हा 33 वर्षांचा असून त्याला मागील वर्षी टी20 विश्वचषकानंतर भारतीय संघात निवडले नव्हते. कारण, निवडकर्त्यांनी करार असलेल्या खेळाडूंना प्राथमिकता दिली होती. बोल्टने माध्यमांशी बोलताना म्हटले की, “आता माझी न्यूझीलंडकडून क्रिकेट खेळण्याची खूपच इच्छा आहे. मी भाग्यवान राहिलो आहे की, मला न्यूझीलंडकडून 13 वर्षे खेळण्याची संधी मिळाली. माझी आताही विश्वचषकात खेळण्याची इच्छा आहे.”
न्यूझीलंड 2019मधील विश्वचषकातील अंतिम सामन्यात इंग्लंड संघाकडून पराभूत झाला होता. मात्र, बोल्टचा विश्वास आहे की, भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या स्पर्धेत त्याचा संघ चॅम्पियन बनू शकतो.
बोल्ट पुढे बोलताना म्हणाला की, “मला आठवते की, 2019च्या अंतिम सामन्यानंतर मी केन विलियम्सनला म्हणालो होतो की, आपल्याला भारतात 2023मध्ये पुन्हा या शिखरावर पोहोचायचे आहे. हे दु:खद आहे की, त्याला गुडघ्याची दुखापत झाली आहे, पण तो विश्वचषकापर्यंत फिट होण्यासाठी आपल्याकडून पूर्ण प्रयत्न करेल. ही इतकी शानदार स्पर्धा आहे आणि मला निश्चितच याचा भाग बनण्याची इच्छा आहे.”
विलियम्सनची दुखापत
विलियम्सन आयपीएलच्या सुरुवातीला दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याच्या विश्वचषकात खेळण्यावरही संशय आहे. बोल्ट म्हणाला की, “वनडेत आमचा संघ शानदार आहे. तसेच, आमच्याकडे खूप चांगले खेळाडू आहेत, ज्यांना भारतात खेळण्याचा चांगला अनुभव आहे, जो विश्वचषकात कामी येईल.”
आयपीएल 2023मध्ये खेळतोय बोल्ट
बोल्टविषयी बोलायचं झालं, तर तो आयपीएल 2023 स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचा भाग आहे. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 8 सामने खेळताना 8.45च्या इकॉनॉमी रेटने 10 विकेट्स घेतल्या आहेत. (pacer trent boult expresses big desire to play odi world cup in india)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Toss : 12 गुणांसाठी भिडायला मुंबई अन् बेंगलोर तयार; नाणेफेक जिंकत हिटमॅनचा गोलंदाजीचा निर्णय
भारताच्या 16 वर्षांखालील खेळाडूंना मिळाले रिषभ पंतचे मार्गदर्शन, एनसीएत झाली भेट