---Advertisement---

उमरानने पहिली विकेट घेताच कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण, व्हिडिओ जिंकेल तुमचेही मन

On: रविवार, नोव्हेंबर 27, 2022 12:58 AM
Umran-Malik
---Advertisement---

आयपीएल 2022मध्ये सातत्यपूर्ण वेगवान गोलंदाजी करणाऱ्या एका खेळाडूसाठी भारतीय संघाचे दार मोकळे झाले. तो खेळाडू इतर कुणी नसून भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आहे. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत भारताकडून वनडे पदार्पण केले. यादरम्यान त्याने 2 विकेट्सही घेतल्या. विशेष म्हणजे, यादरम्यान घेतलेल्या पहिल्या विकेटनंतर त्याच्या कुटुंबीयांचा आनंद पाहण्यासारखा होता. अशात उमरान मलिकच्या कुटुंबाचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये ते आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.

उमरान मलिक (Umran Malik) याने न्यूझीलंड दौऱ्यातील पहिल्या वनडे सामन्याद्वारे आपल्या वनडे कारकीर्दीतील पहिला वनडे सामना खेळला. या सामन्यात भारताच्या वाट्याला पराभव आला, पण उमरानच्या गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधले. या सामन्यात त्याने भारतासाठी सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या.

उमरानने या सामन्यात न्यूझीलंडच्या डावादरम्यान 16व्या षटकात डेवॉन कॉनवे याला तंबूचा रस्ता दाखवला. तसेच, वनडे क्रिकेटमधील आपली पहिली विकेट घेतली. या विकेटनंतर त्याच्या घरी टीव्ही पाहताना त्याचे कुटुंबीय आनंदाने उड्या मारू लागले. यादरम्यान एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्याचे आई- वडील आणि भाऊ एकमेकांची गळाभेट घेताना दिसत आहेत. त्यांच्यासाठी हा खूपच मोलाचा क्षण होता. आपल्या मुलाला अशाप्रकारे यश मिळवताना पाहून आई-वडीलही भावूक झाले. हा व्हिडिओ सर्वांची मने जिंकत आहे.

https://twitter.com/64MohsinKamal/status/1596521348704051201

सामन्याचा आढावा
खरं तर, या सामन्यात भारतीय संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 7 विकेट्स गमावत 306 धावा केल्या होत्या. यावेळी भारताकडून श्रेयस अय्यर याने सर्वाधिक 80 धावांचे योगदान दिले होते. शिखर धवन यानेही 77 चेंडूत 72 धावा चोपल्या होत्या. भारताच्या 307 धावांचे आव्हान न्यूझीलंडने 47.1 षटकात 3 विकेट्स गमावत पार केले आणि विजय मिळवला.

न्यूझीलंडविरुद्ध 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रविवारी (दि. 27 नोव्हेंबर) हॅमिल्टन येथे खेळला जाईल. मालिका जिंकण्यासाठी भारताला पुढील दोन्ही सामने जिंकावे लागतील. (pacer umran malik s family celebrates first wicket nz vs ind 1st odi read here)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गजब तमाशा! पाऊस तर नव्हताच, मग का थांबवण्यात आला अंतिम सामना? घडला प्रकार व्हिडिओत कैद
भारत- न्यूझीलंड संघातील दुसऱ्या वनडेत पाऊस घालणार का रोडा? जाणून घ्या कसे असेल वातावरण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---