आयपीएलच्या १३व्या हंगामातील तिसरा सामना आज सनरायझर्स हैद्राबाद विरुद्ध रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघात होत आहे. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे हा सामना होत आहे. विराट कोहली रॉयल चॅलेंजर बेंलगोर संघाचे तर सनरायझर्स हैद्राबादचे नेतृत्त्व डेविड वॉर्नर करत आहे. सनरायझर्स हैद्राबादचा कर्णधार डेविड वॉर्नरने नाणेफेक जिंकत या सामन्यात प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात २० वर्षीय देवदत्त पडिक्कलने पदार्पण केले. त्याने ४२ चेंडूंचा सामना करताना ८ चौकारांच्या मदतीने तडाखेबंद ५६ धावा केल्या. याचबरोबर त्याने अनेक विक्रमही केले. त्यातील काही खास विक्रम-
-२०१६नंतर आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारा पहिला फलंदाज. २०१६मध्ये सॅम बिलिंग्जने पदार्पणात अर्धशतकी खेळी केली होती.
-२०१० नंतर आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारा पहिला भारतीय फलंदाज. २०१०मध्ये अंबाती रायडू व केदार जाधवने पदार्पणात अर्धशतकी खेळी केली होती.
-२००८ नंतर आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारा पहिला आरसीबीचा फलंदाज. २००८मध्ये एस गोस्वामीने पदार्पणात अर्धशतकी खेळी केली होती.
-रणजी ट्रॉफी, विजय हजारे ट्रॉफी, सईद मुश्ताक अली ट्रॉफी व आयपीएल स्पर्धेत पदार्पणात अर्धशतक करणारा पहिला क्रिकेटर.
-आयपीएल पदार्पणात अर्धशतक करणारा दुसरा सर्वात युवा क्रिकेटर. यापुर्वी २००८मध्येच एस गोस्वामीने १९ वर्ष व १ दिवसांचे असताना अर्धशतकी खेळी केली होती.