---Advertisement---

18 वर्षांचा आयपीएल प्रवास, हे 4 खेळाडू ठरले कायमचे साथीदार

On: शुक्रवार, एप्रिल 18, 2025 1:33 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगचा पहिला सामना आजपासून बरोबर 18 वर्षांपूर्वी, 18 एप्रिल 2008 रोजी खेळला गेला होता. बेंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आरसीबी आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेल्या या सामन्याने आयपीएलच्या पर्वाला सुरुवात झाली.

त्या दिवशीपासून आजपर्यंत अनेक खेळाडू आले आणि गेले, पण काही दिग्गज अजूनही मैदानावर तितक्याच जोमाने खेळताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, आयपीएलच्या सुरुवातीच्या हंगामात सहभागी असलेले चार खेळाडू अजूनही दरवर्षी मैदानात उतरतात.

विराट कोहली – आरसीबीशी अटूट नातं
या यादीत सर्वात वर आहे विराट कोहली, जो आयपीएलच्या सुरुवातीपासून फक्त आरसीबीसाठीच खेळतो आहे. 2008 पासून ते 2025 पर्यंत, प्रत्येक हंगामात किमान एक सामना खेळणारा विराट एकमेव खेळाडू आहे, ज्याचे संघाशी नातं अजूनही अबाधित आहे.

रोहित शर्मा – हिटमॅनची आयपीएल कारकीर्द
रोहित शर्मा हाही दरवर्षी आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये आहे. त्याने डेक्कन चार्जर्स आणि मुंबई इंडियन्स या दोन संघांसाठी 18 हंगाम खेळले आहेत. रोहितच्या नेतृत्वात मुंबईने 5 वेळा ट्रॉफी जिंकली आहे.

महेंद्रसिंह धोनी – अजूनही ‘माही मॅजिक’ कायम
एमएस धोनीनेही प्रत्येक हंगामात भाग घेतला आहे. तो मुख्यतः चेन्नई सुपर किंग्सकडून खेळतो, पण चेन्नईवर बंदी असताना त्याने रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून दोन हंगाम खेळले. त्यानेही चेन्नईला 5 आयपीएल ट्राॅफ्या जिंकून दिल्या आहेत.

मनीष पांडे – संघ बदलला, खेळ कायम
या यादीतील चौथा नाव म्हणजे मनीष पांडे. त्याने आरसीबी, मुंबई, पुणे, हैदराबाद, दिल्ली, लखनऊ आणि केकेआर यांसारख्या सात संघांसाठी आयपीएलमध्ये सहभाग घेतला आहे. पण विशेष म्हणजे, त्यानेही प्रत्येक हंगामात किमान एक सामना खेळलेला आहे.

18 वर्षांपूर्वी सुरू झालेला आयपीएल आता ग्लोबल ब्रँड झाला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---