---Advertisement---

IPL मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे टॉप-5 यष्टिरक्षक फलंदाज, जाणून घ्या एका क्लिकवर

On: शुक्रवार, एप्रिल 18, 2025 1:52 PM
---Advertisement---

क्रिकेटच्या मैदानावर एका यष्टीरक्षक फलंदाजाची भूमिका खूप महत्त्वाची असते. तो एक कर्णधार यष्टीरक्षक आणि एक फलंदाजाच्या स्वरूपात संघासाठी खेळत असतो. वर्ल्ड क्रिकेटमध्ये सुद्धा असे काही यष्टीरक्षक फलंदाज राहिले आहेत, ज्यांनी त्यांच्या शानदार फलंदाजीने आणि चतुर विकेटकीपिंगने आयपीएल स्पर्धा रोमांचक ठरवली आहे. चला तर जाणून घेऊया ते 5 विस्फोक यष्टीरक्षक फलंदाज ज्यांनी आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त षटकार झळकावले आहेत.

1. महेंद्र सिंग धोनी
महेंद्रसिंग धोनी आयपीएल इतिहासामध्ये सर्वात जास्त षटकार ठोकणारा यष्टीरक्षक फलंदाज आहे. महेंद्रसिंग धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 236 डावांमध्ये एकूण 260 षटकार ठोकलेले आहेत, तसेच महेंद्रसिंग धोनीने आत्तापर्यंत 5373 धावा केल्या आहेत. याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये आत्तापर्यंत विकेटच्या मागे 201 खेळाडू बाद केले‌ आहेत. ज्यामध्ये 155 कॅच आणि 46 स्टंपिंग सुद्धा सामील आहेत.

2. संजू सॅमसन
आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त षटकार ठोकणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत संजू सॅमसन दुसऱ्या स्थानावर आहे. संजूने आयपीएलमध्ये आतापर्यंत 170 डावात एकूण 216 षटकार झळकावले आहेत. त्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत 463 धावा केल्या आहेत. तसेच त्याने विकेटच्या मागे 101 खेळाडू बाद केले आहेत. ज्यामध्ये 84 कॅच आणि 17 स्टंपिंगचा समावेश आहे.

3. के एल राहुल
के एल राहुल या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. के एल राहुलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 128 डावांमध्ये 199 षटकार झळकावले आहेत. त्याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 4921 धावा सुद्धा केल्या आहेत. त्याने विकेटच्या मागे 91 खेळाडू बाद केले आहेत, ज्यामध्ये 84 कॅच आणि 7 स्टंपिंगचा समावेश आहे.

4. दिनेश कार्तिक

आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त षटकार ठोकणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीमध्ये दिनेश कार्तिक चौथ्या स्थानावर आहे. दिनेश कार्तिकने आत्तापर्यंत खेळलेल्या 234 डावांमध्ये 161 षटकार झळकावले आहेत. तसेच त्याने आयपीएलमध्ये 4842 धावा केलेल्या आहेत. तसेच त्याने विकेटच्या मागे 182 खेळाडूंना बाद केले आहे, ज्यामध्ये 145 कॅच आणि 37 स्टंपिंग सामील आहेत

    5. रिषभ पंत
    आयपीएलच्या इतिहासात सर्वात जास्त षटकार ठोकणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीमध्ये रिषभ पंत पाचव्या स्थानावर आहे, ऋषभ पंतने आतापर्यंत खेळलेल्या 116 डावांमध्ये 159 षटकार झळकावले आहेत. ऋषभने आयपीएलमध्ये आतापर्यंत 3387 धावा केल्या आहेत. तसेच त्याने विकेटकीपिंग करत 102 खेळाडूंना बाद केले आहे. तसेच त्यामध्ये 79 कॅच आणि 23 स्टंपिंग सामील आहेत.

      Join WhatsApp

      Join Now

      Join Telegram

      Join Now
      ---Advertisement---