क्रीडाक्षेत्रातील पद्म पुरस्कार 2025: प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, भारत सरकारने 2025च्या पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. या यादीत क्रीडा जगतातील पाच दिग्गजांची नावे आहेत. यामध्ये पीआर श्रीजेश आणि रविचंद्रन अश्विन ही प्रमुख नावे आहेत. भारतीय पुरुष हॉकी संघाचा माजी गोलकीपर पीआर श्रीजेशला पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
तर टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आर. अश्विनला पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या धनुर्धारी हरविंदर सिंगला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तर भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार आयएम विजयन आणि प्रसिद्ध पॅरा अॅथलेटिक्स प्रशिक्षक सत्यपाल सिंग यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने कांस्यपदक जिंकले. ऑलिंपिकमध्ये भारतीय संघाचे हे सलग दुसरे कांस्यपदक होते. यापूर्वी, संघाने टोकियो ऑलिंपिक (2020) मध्येही ही कामगिरी केली होती. भारतीय संघाच्या या कामगिरीत गोलकीपर पीआर श्रीजेशची महत्त्वाची भूमिका होती. गोलकीपर म्हणून, पीआर श्रीजेशने संपूर्ण स्पर्धेत भारतीय गोलचे रक्षण भिंतीसारखे केले. पॅरिस ऑलिंपिकसह, श्रीजेशने आंतरराष्ट्रीय हॉकीला निरोप दिला होता. श्रीजेशने आधीच जाहीर केले होते की पॅरिस ऑलिंपिक ही त्याची शेवटची स्पर्धा असणार आहे.
PR SREEJESH HAS BEEN HONOURED WITH PADMA BHUSAN. 🎖️ pic.twitter.com/zQ5XZSkrWB
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 25, 2025
आर. अश्विनबद्दल बोलायचे झाले तर, त्याने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी (BGT) 2024-25 दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. अश्विनने 106 कसोटी सामन्यांमध्ये 24 च्या सरासरीने 537 विकेट्स घेतल्या आहेत. तर 116 एकदिवसीय सामन्यांमध्ये 33.20 च्या सरासरीने 156 विकेट्स घेतल्या. अश्विनने 65 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळला आहे. ज्यात त्याने 23.22 च्या सरासरीने 72 विकेट्स घेतल्या.
जर आपण फलंदाजीच्या रेकॉर्डबद्दल बोललो तर, अश्विनने विशेषतः कसोटी सामन्यांमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. अश्विनने 151 कसोटी डावांमध्ये 25.75 च्या सरासरीने 3503 धावा केल्या. या दरम्यान त्याने 6 शतके आणि 14 अर्धशतके झळकावली. एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात त्याने 63 डावांमध्ये 707 धावा केल्या आहेत. तर, टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात अश्विनला 19 डावांमध्ये फक्त 184 धावा करता आल्या.
🚨 PADMA SHRI FOR ASHWIN. 🚨
– Ravichandran Ashwin has been honoured with Padma Shri Award. 🐐🇮🇳 pic.twitter.com/DLGzcvzNlp
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 25, 2025
तर, आयएम विजयन यांची गणना भारतीय फुटबॉलमधील महान खेळाडूंमध्ये केली जाते. विजयन यांनी 2000-2004 दरम्यान भारतीय संघाचे नेतृत्वही केले. विजयनने भारतासाठी 72 सामन्यांमध्ये 29 गोल केले. 55 वर्षीय विजयन हा बायचुंग भुतियासह भारतीय आक्रमणाचा मुख्य आधार होता.
दुसरीकडे, ‘कैथलचा एकलव्य’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 33 वर्षीय हरविंदर सिंगने पॅरिस पॅरालिम्पिक 2024 दरम्यान पुरुषांच्या वैयक्तिक रिकर्व्ह ओपनमध्ये पोलंडच्या लुकास सिझेकचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. लहानपणी जेव्हा त्याला डेंग्यू झाला तेव्हा त्याला चुकीचे इंजेक्शन देण्यात आले, ज्यामुळे त्याच्या पायात विकृती निर्माण झाली.
पद्म पुरस्कार 2025: (क्रीडा)
पीआर श्रीजेश – पद्मभूषण
आर. अश्विन – पद्मश्री
आयएम विजयन – पद्मश्री
सत्यपाल सिंग – पद्मश्री
हरविंदर सिंग – पद्मश्री
हेही वाचा-
भारताचा फिरकी जादूगार रविचंद्रन अश्विनला पद्मश्री पुरस्कार जाहीर…!
IND vs ENG; अटीतटीच्या सामन्यात भारताचा शानदार विजय, तिलक वर्मा एकटाच भिडला
IND vs ENG; कर्णधार जोस बटलरची एकतर्फी झुंज! भारतासमोर 166 धावांचे आव्हान