२६ जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आज पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे. या पुरस्कारांमध्ये भारताच्या तब्बल सात खेळाडूंना पद्म पुरस्कार जाहीर झाल्याचे वृत्त आहे. गृह मंत्रालयाने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर केलेल्या यादीत या सात खेळाडूंची नावे असल्याचे समोर येत आहे.
पद्म पुरस्कार मिळालेल्या खेळाडूंमध्ये मौमा दास, पी अनिता, अंशू जम्सेनपा, माधवन नामिबियार, सुधा हरी नारायण सिंग, वीरेंदर सिंग आणि केवाय व्यंकटेश सिंग यांचा समावेश आहे. या सगळ्या खेळाडूंना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. एकूण १०२ जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून यात सात खेळाडूंचा समावेश आहे. पद्मश्री पुरस्कार हा देशातील चौथ्या क्रमांकाचा सर्वोच्च पुरस्कार आहे.
Former Governor of Goa Mridula Sinha, British film director Peter Brook, Father Vallés (posthumous), Professor Chaman Lal Sapru (posthumous) are among 102 recipients of Padma Shri award. pic.twitter.com/oMoHg3DXcc
— ANI (@ANI) January 25, 2021
दरम्यान, कोरोनामुळे यंदाचे वर्ष क्रीडा क्षेत्रासाठी सुने सुने गेले. मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तब्बल सात जणांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने भारतीय क्रीडा वर्तुळात आनंदाचे वातावरण आहे.
महत्वाच्या बातम्या:
बेअरस्टोने केली जादू! चालू सामन्यात लाल चेंडूला बनवले पांढरे
भारतात पोहचण्याआधीच इंग्लडला बसला धक्का, कठोर नियमांमुळे सरावासाठी मिळणार फक्त इतके दिवस