यावर्षी (2020) दोन्ही गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता दिग्गज टेनिसपटू रॉजर फेडरर तंदुरुस्त असून तो आता सराव करत आहे. जानेवारी 2021 मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत खेळण्याची आशा त्याने व्यक्त केली आहे.
20 वेळा ग्रँड स्लॅम चॅम्पियन फेडरर या वर्षाच्या सुरुवातीला (2020) मेलबर्न पार्क येथे झालेल्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत उपांत्य फेरीत पोहचला होता. परंतु त्याच्या उजव्या गुडघ्यावर झालेल्या शस्त्रक्रियेनंतर तो उर्वरित टेनिसच्या हंगामात सहभाग घेऊ शकला नाही.
जर्मन भाषेचे मासिक श्वाइझर इलस्टिरिटशी बोलताना फेडरर म्हणाला की, “मी योग्य मार्गावर आहे, मी हळूहळू सरावाला सुरुवात करत आहे. पण मी माझा वेळ घेणार आहे आणि स्वत: वर दबाव आणू इच्छित नाही. मी 100% तंदुरुस्त असेल तेव्हाच एखाद्या स्पर्धेत भाग घेईन. या क्षणी मला असे वाटते की मी जानेवारीत होणाऱ्या ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये पुनरागमन करू शकेल.”
त्याच्या पुनरागमनासाठी त्याने शास्त्रक्रियेनंतरही खूप प्रगती केली आहे, परंतु सामान्य खेळाडूप्रमाणे तो अजूनही तंदुरुस्त झालेला नाही.याबद्दल बोलताना फेडरर म्हणाला, “या क्षणी दोन तासांहून अधिक काळ खेळणे शक्य नाही,”
दिग्गज टेनिसपटू राफेल नदाल याने नुकतेच आपल्या कारकिर्दीतील 20 वे ग्रँड स्लॅम किताब जिंकून जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या फेडररची बरोबरी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पॅरिस मास्टर स्पर्धेत राफेल नदाल होणार सहभागी
जर्मनीच्या झ्वेरेव्हने जिंकले कोलोन टेनिस स्पर्धेचे विजेतेपद
St. Petersbug Open : रियल ओपाल्कने गतविजेत्या मेदवेदेवला दिला पराभवाचा धक्का






टी20 वर्ल्डकप 2026: एमएस धोनी करणार का कमेंट्री? माजी कर्णधारने दिला थेट उत्तर