फ्रेंच टेनिस खेळाडू बेनोईट पायरे याला रॅकेट आपटल्याबद्दल १६५०० डॉलरचा दंड झाला आहे. वॉशिंग्टन ओपनमध्ये पैर हा सायप्रिओट मार्कोस बघदातिसकडून ६-३, ३-६, ६-२ असा पराभूत झाला.
या निराशाजनक कामगिरीमुळे पायरेने रागावून त्याची रॅकेट चार वेळा जमिनीवर आपटली. नंतर त्याने ती रॅकेट फेकून दुसरी घेतली. मात्र तो बाकावर बसला असता परत त्याने रॅकेट फेकली. त्याने फेकलेल्या रॅकेट्स नंतर बॉल बॉयने उचलल्या.
बघदातिस हा त्याच्या रागिट स्वभावामुळे प्रसिद्ध आहे. त्यानेही यावेळी पैरला समजावण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही.
You ok? @benoitpaire pic.twitter.com/OBLoNAyYea
— Philip Fama (@tweener_head) August 1, 2018
“हो हे बरोबर आहे काल मी खूपच निराश झालो”, अशी पोस्ट त्याने इंस्टाग्रामवर शेयर केली.
https://www.instagram.com/p/Bl8KdY_hvat/?utm_source=ig_web_copy_link
एटीपीने पायरेला प्रवेश फीच्या रक्कमेचा दुप्पट दंड ठोठावला आहे. तसेच जागतिक क्रमवारीत पायरे हा ५५व्या तर बघदातिस ९१व्या क्रमांकावर आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या-
–दिग्गज ब्रायन लाराच्या विश्वविक्रमाला विराट कोहलीकडून धक्का
–दिग्गजांकडून मिळवली विराटने वाहवा