टी20 विश्वचषकात (T20 World Cup) गुरूवारी (3 नोव्हेंबर) पाकिस्तान विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात सिडनीमध्ये सुपर 12चा सामना खेळला गेला. या स्पर्धेत आपले आव्हान कायम राखण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकणे आवश्यक होते आणि झालेही तसेच. त्यांनी हा सामना डकवर्थ लुईसच्या नियमानुसार 33 धावांनी जिंकला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी केली, मात्र दोन्ही सलामीवीर लवकरच बाद झाल्याने त्यांची सुरूवात निराशाजनक झाली. या सामन्यात असे काही घडले ज्यावरून पाकिस्तानच्या खेळाडूंना क्रिकेटचे नियम नक्की किती माहित आहे, अशा चर्चा सुरू झाल्या.
इफ्तिखार अहमद (Iftikhar Ahmed) आणि शादाब खान (Shadab Khan) यांनी अर्धशतकी खेळी केली, त्यामुळे पाकिस्तानने 20 षटकात 185 धावा केल्या. यावेळी पाकिस्तान फलंदाजी करत होता तेव्हा मोहम्मद नवाज (Mohammad Nawaz) ज्याप्रकारे बाद झाला, त्यावरून पाकिस्तानच्या खेळाडूंना आयसीसीच्या नियमांचा विसर पडल्याचे दिसले.
पाकिस्तानची फलंदाजी सुरू होती, तेव्हा त्यांनी 7 षटकातच 43 धावसंख्येवर 4 विकेट्स गमावल्या. त्यामुळे पाकिस्तानचा संघ अडचणीत आला होता. नंतर उपकर्णधार शादाब खान याने 52 आणि इफ्तिखार अहमद याने 51 धावा केल्या. यामुळे त्यांना समाधानकारक धावसंख्या उभारता आली. मात्र या सामन्यातील 13वे षटक थोडेफार नाट्यमय ठरले.
तबरेज शम्सी 13वे षटक टाकण्यास आला. त्या षटकातील शेवटच्या चेंडूवर नवाज स्विप शॉट खेळायला गेला, तो चेंडू त्याच्या बॅटची कड घेऊन पॅडला लागला. तेव्हाच दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनी पायचीतसाठी अपील केले आणि पंचांनी त्याला बादही दिले. त्याचवेळी एक वेगळेच दृष्ट पाहायला मिळाले. नवाज चेंडू खेळताच धाव घेण्यास पळाला, मात्र नॉन-स्ट्रायकर इफ्तिखार अहमद त्याला परत पाठवतो. त्यादरम्यान क्षेत्ररक्षक लुंगी एनगिडी डी कॉककडे थ्रो करत त्याला धावबाद करतो आणि नवाज पायचीत बाद होतो तो धावबाद होत नाही कारण जेव्हा पंचांनी निर्णय दिला तेव्हा तेथेच त्याची ऍक्शन संपली. मग पुढे काहीही होऊ तो डेड मानला जातो. येथेच पाकिस्तानला रिव्हूय घेण्याची आवश्यकता होती.
https://twitter.com/KuchNahiUkhada/status/1588102141314404353?s=20&t=IKBCrL-hplgdcnSnXe5f_Q
पाकिस्तानने रिव्ह्यू घेतला असता तर नवाज बाद होण्यापासून बचावला असता कारण अल्ट्राएजमध्ये बॅटचा समावेश दिसला होता. मात्र, नवाजने रिव्ह्यू घेतला नाही आणि पंचांनी आधीच त्याला पायचीत बाद दिले. जर नवाज किंवा इफ्तिखार यांना हा नियम माहित असता तर रिव्ह्यू घेऊन नवाज बाद होण्यापासून वाचला असता. त्याचबरोबर इथे इफ्तिखारला नवाज नक्की धावबाद झाला की पायचीत हे पण माहित नव्हते. पंचांनी बाद दिल्यावरही वाद झाला. यावेळी काहींचे असे मत होते की पंचांनी फलंदाजाला थांबून रिव्ह्यू घ्यायचा की नाही हे विचारायला पाहिजे होते.
हा सामना पाकिस्तानने जिंकल्याने त्यांच्या उपांत्य फेरीच्या आशा कायम आहे. तसेच त्यांचा शेवटचा सामना बांगलादेशविरुद्ध 6 नोव्हेंबरला आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अवघ्या 22 वर्षांच्या वयात आफ्रिदी गाजला, आफ्रिकेच्या धुरंधरांना तंबूत धाडताच केला खास विक्रम
पंचांना ‘असे’ बोलण्याचा विराटला अधिकार नाही! गौतम गंभीरने पुन्हा साधला निशाणा