पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया संघात ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना अनिर्णित राहिला. शनिवारपासून (१२ मार्च) उभय संघातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलिया संघाकडून शानदार अर्धशतक ठोकले. विशेष म्हणजे, त्याचे हे शतक पाकिस्तानमधील पहिले शतक असल्यामुळे त्याच्यासाठी खूप खास आहे. ख्वाजाचे पाकिस्तानशी जवळचे नाते आहे. अवघ्या ५ वर्षांच्या वयात ख्वाजा कुटुंबासोबत पाकिस्तान सोडून ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाला होता. त्याचा जन्म पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे झाला होता. या मालिकेपूर्वी ख्वाजाने अपेक्षा व्यक्त केली होती की, त्याला पाकिस्तानी जनतेचा पूर्ण पाठिंबा मिळेल, पण त्याच्या ऑस्ट्रेलिया संघासोबत असे होणार नाही.
पाकिस्तानला जाण्यापूर्वी उस्मान ख्वाजा (Usman Khawaja) माध्यमांशी बोलताना म्हणाला होता की, “मला नेहमीच पाकिस्तानाकडून खूप पाठिंबा मिळाला आहे. मला नेहमीच पाकिस्तानातून खूप प्रेम मिळाले आहे. मला वाटते की, ते मला पाठिंबा देतील. पण त्यांना अशीही अपेक्षा असेल की, पाकिस्तानने ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे.”
https://twitter.com/TheRealPCB/status/1502602927113916420?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1502602927113916420%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fhindi.cricketnmore.com%2Fcricket-news%2Fpak-vs-aus-usman-khawaja-first-test-100-in-pakistan-95607
तब्बल २४ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला आहे. ऑस्ट्रेलियन संघाने यापूर्वी १९८८ मध्ये पाकिस्तानचा दौरा केला होता. या मालिकेपूर्वी उस्मान ख्वाजा पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत अफलातून कामगिरी करेल, अशी चाहत्यांना अपेक्षा होती. तसेच, ख्वाजानेही चाहत्यांना अजिबात निराश केले नाही आणि पहिल्या कसोटीतही त्याने ९७ धावांची शानदार खेळी खेळली होती.
दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ख्वाजाच्या शतकामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ आपल्या नावावर केला. दिवसाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया संघाने ३ विकेट्स गमावत २५१ धावा केल्या आहेत. उस्मान ख्वाजा नाबाद १२७ आणि नेथन लायन शून्य धावेवर खेळतायत. स्टीव्ह स्मिथने ७२ धावा, तर डेविड वॉर्नरने ३६ धावा केल्या होत्या.
उस्मान ख्वाजाबद्दल बोलायचं झालं, तर ४८ कसोटी सामने खेळले आहेत. कसोटीत त्याने ८३ डावात ४४.८८ च्या सरासरीने ३३६६ धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने ११ शतकेही ठोकली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
साजिद खानच्या रॉकेट थ्रोने ऑस्ट्रेलियन फलंदाजाला धाडलं तंबूत; तब्बल २७ वर्षांनंतर घडली ‘अशी’ घटना
‘मॅचविनिंग’ शतकानंतर स्मृतीने दिली ‘त्या’ गोष्टीची प्रांजळ कबुली