पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेशने यजमान संघाची अवस्था खराब केली आहे. परिस्थिती अशी आहे की, कसोटी सामन्याच्या मध्यावरही पाकिस्तानचे गोलंदाज खेळपट्टीवर प्रश्न उपस्थित करत आहेत. रावळपिंडीत खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटीचा पहिला डाव पाकिस्तानने 448 धावांवर घोषित केला होता. प्रत्युत्तरात बांग्लादेशने 565 धावा केल्या. आता पाचव्या दिवशी बांग्लादेशचा संघही ही कसोटी जिंकू शकतो.
बांग्लादेशने पहिल्या डावात 117 धावांची आघाडी घेत संपूर्ण जगाला चकित केले आहे. बांग्लादेशसाठी प्रथम मुशफिकर रहीम आणि लिटन दास यांनी करिष्माई भागीदारी केली. त्यानंतर रहीमने मेहंदी हसन मेराजसह पाकिस्तान संघाला खूप चोपले. 218 धावांवर पाच विकेट पडल्यानंतर मुशफिकर रहीम आणि लिटन दास यांनी धावसंख्या 332 धावांपर्यंत नेली. त्यानंतर रहीम आणि मेराज यांनी 196 धावांची भागीदारी केली.
रहीमने शानदार फलंदाजी केली, पण द्विशतक झळकावण्यास तो थोडक्यात हुकला. रहीमने 341 चेंडूंत 22 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 191 धावांची खेळी केली. तर मेहंदी हसन मेराजने 179 चेंडूत 6 चौकारांच्या मदतीने 77 धावा केल्या. याआधी लिटन दासने 56 धावांची खेळी केली होती. सलामीवीर शादमान इस्लामनेही 93 धावांचे योगदान दिले. तर पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदी, खुर्रम शहजाद आणि मोहम्मद अली यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. याशिवाय नसीम शाहला तीन यश मिळाले. सॅम अयुबने एक विकेट घेतली.
पाकिस्तानने दुसऱ्या डावात एक विकेट गमावली आहे. पहिल्या डावात अर्धशतक झळकावणारा सॅम अयुब दुसऱ्या डावात केवळ एक धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. आता बांग्लादेशला पाचव्या दिवशी विजयाची आशा आहे. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर फिरकी अष्टपैलू मेहंदी हसन मेराजने आपल्या संघाच्या विजयाचा दावा केला. तसे पाहता पाकिस्तान अजूनही 94 धावांनी मागे आहे. या कसोटीत बांग्लादेशने पाकिस्तानचा प्रत्येक डाव चकवला आहे.
हेही वाचा-
जो रूटने मोडला राहुल द्रविड-ॲलन बॉर्डरचा मोठा विक्रम, लवकरच रचणार इतिहास
“हा खेळाडू भविष्यात रविचंद्रन अश्विनसाठी योग्य पर्याय…”, माजी क्रिकेटपटूचा मोठा अंदाज
श्रीलंकेला हरवून इंग्लंडने WTC गुणतालिकेत घेतली झेप, भारताचा नुकसान झाला का?