---Advertisement---

बांग्लादेश मालिकेपूर्वी संघाला धक्का, सरावादरम्यान स्टार खेळाडू जखमी

On: शनिवार, ऑगस्ट 17, 2024 1:32 PM
Pakistan Test Squad
---Advertisement---

बांग्लादेश आणि पाकिस्तान यांच्यातील 2 कसोटी सामन्यांची मालिका बुधवार, 21 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान रावळपिंडी येथील रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अशा परिस्थितीत दोन्ही संघ आपापल्या तयारीत व्यस्त आहेत.

तत्तपूर्वी यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज बाबर आझम नेटमध्ये सराव करताना जखमी झाला. नेटमध्ये तो वेगवान गोलंदाज खुर्रम शेहजादशी सामना करत होता. आता कसोटी मालिकेपूर्वी बाबर आझमच्या दुखापतीमुळे पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या आहेत.

नेट सत्रादरम्यान पाकिस्तानच्या माजी कर्णधाराच्या पोटाला दुखापत झाली. यावेळी तो खूप अडचणीत असल्याचे दिसून आले. शहजादनेही ताबडतोब बाबरला गाठून त्याची प्रकृती विचारली. दुखापतीनंतर शेहजादने पुढच्याच चेंडूवर बाबर आझमला क्लीन बोल्ड केले. बाबरला बाद केल्यानंतर खुर्रम शेहजाद आनंद साजरा करताना दिसला.

 

बाबर आझमच्या कसोटी करिअरबाबत बोलायचे झाल्यास, त्याने 13 ऑक्टोबर 2016 रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. बाबर आझमने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत 52 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने 94 डावांमध्ये 45.85 च्या सरासरीने आणि 54.86 च्या स्ट्राईक रेटने 3898 धावा केल्या आहेत. बाबर आझमच्या नावावर कसोटीत 26 अर्धशतके आणि 9 शतके आहेत. या फाॅरमॅटमध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 196 धावा आहे.

दोन्ही देशाचे संघ

बांग्लादेश संघ – नजमुल हुसेन शांतो (कर्णधार), महमुदुल हसन जॉय, झाकीर हसन, शादमान इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन कुमार दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नईम हसन, तस्किन अहमद, सय्यद खालिद. अहमद, नाहिद राणा, शरीफुल इस्लाम आणि हसन महमूद

पाकिस्तान संघ – शान मसूद (कर्णधार), सौद शकील (उपकर्णधार), आमिर जमाल, अब्दुल्ला शफीक, अबरार अहमद, बाबर आझम, कामरान गुलाम, खुर्रम शहजाद, मीर हमजा, मोहम्मद अली, मोहम्मद हुरैरा, मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), नसीम शाह, सैम अयुब, सलमान अली आगा, सरफराज अहमद (यष्टीरक्षक) आणि शाहीन शाह आफ्रिदी

कसोटी  सामन्याचे वेळापत्रक

पहिली कसोटी: 21 ते 25 ऑगस्ट, रावळपिंडी क्रिकेट स्टेडियम
दुसरी कसोटी: 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर, नॅशनल स्टेडियम कराची

हेही वाचा-

मायदेशी पोहोचताच विनेश फोगट भावूक! बजरंग-साक्षीने दिली हिंमत
पीआर श्रीजेशची जागा कोण घेणार? जाणून घ्या सर्वात मोठे 3 दावेदार
गोलंदाजांसाठी काळचं! पाहा कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारे घातक फलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---