पाकिस्तान आणि बांग्लादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना रावळपिंडीत खेळवला जात आहे. या सामन्यात बांग्लादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्यात पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली होती. अवघ्या 16 धावांवर संघाने पहिले तीन विकेट गमावले. पाकिस्तानची तिसरी विकेट बाबर आझमच्या रूपाने पडली. तो शून्यावर बाद झाला. शरीफुल इस्लामने बाबरला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. आता बाबर आझम शून्यवर आऊट झाल्यानंतर तो सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होत आहे.
अब्दुल्ला शफीक आणि सॅम अयुब रावळपिंडीत पाकिस्तानकडून सलामीला आले. यादरम्यान शफिक अवघ्या 2 धावा करून बाद झाला. यानंतर लगेचच शान मसूद पॅव्हेलियनमध्ये परतला. पाकिस्तानची तिसरी विकेट बाबरच्या रूपाने पडली. 2 चेंडूंचा सामना करताना तो शून्यावर बाद झाला. बाबर आऊट झाल्यानंतर सोशल मीडिया यूजर्सनी त्याला ट्रोल केले.
खरंतर बाबर आझमचे चाहते त्याची तुलना विराट कोहलीसोबत करतात. कोहली आणि बाबरची तुलना करणाऱ्या अनेक पोस्ट सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. आता तो शून्यावर आऊट झाल्यावर ट्रोल झाला. कोहलीच्या एका चाहत्याने लिहिले, “आणि हे विराट कोहलीपेक्षा चांगले आहे.” अहो, झिम्बाब्वेचा कोणीतरी आहे, त्याला खायला द्या.” या पोस्टसोबत इतरही पोस्ट शेअर केल्या आहेत.
Pakistan 🇵🇰 1st innings is over in pindi #PAKvsBAN #BabarAzam pic.twitter.com/yJZI0JtUHe
— Shan Ali🇵🇰 (@Ali_Insp) August 21, 2024
और ये विराट कोहली से बेहतर है!
अरे कोई ज़िम्बाब्वे से खिलाओ इसे😂#BabarAzam #ViratKohli𓃵 #PakistanCricket #PAKvBAN #BharatBand #भारत_बंद pic.twitter.com/yzEdX0tFmN
— Virat Kohli 𝐅𝐚𝐧🌈™ (@Champion_Kohli) August 21, 2024
Babar Azam gone for a two ball duck.#PAKvBAN pic.twitter.com/xDEe9nkGNQ
— 𝙎𝙝𝙚𝙧𝙞 (@CallMeSheri1) August 21, 2024
हेही वाचा-
विराट कोहली खरंच बदलला आहे का? पियुष चावलाचा मोठा गाैप्यस्फोट!
5 चेंडू 5 षटकार, या गोलंदाजाची कारकीर्द संपण्याच्या मार्गावर होती; पण कोहलीने आयुष्य बदलले
लेडी बुमराह! शाळेतल्या मुलीनं कॉपी केली जसप्रीत बुमराहची बॉलिंग ॲक्शन; VIDEO व्हायरल