पाकिस्तान क्रिकेट संघाला जिंकण्याची मानसिकता ठेवावी लागेल. असे मत पाकिस्तानचा कसोटी कर्णधार शान मसूद याने व्यक्त केले. मुलतान कसोटीत इंग्लंडविरुद्ध एक डाव आणि 47 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर त्याने संघातील फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही तोंडघशी पाडले. त्याने विजयाचे श्रेय पूर्णपणे इंग्लंडला दिले. खेळपट्टीबद्दलही सांगितले की, कोणत्याही खेळपट्टीवर कसे जिंकायचे हे इंग्लंडकडून शिकण्याची गरज आहे.
पराभवानंतर बोलताना शान मसूद म्हणाला, ‘या आधी आपण तिसऱ्या किंवा चौथ्या डावाबद्दल बोललो. पण शेवटी हा संघाचा खेळ आहे. प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे असतात. जेव्हा तुम्ही स्कोअरबोर्डवर 550 धावा करता तेव्हा तुम्ही 10 विकेट्स घेऊन त्याचे बॅकअप करणे महत्त्वाचे असते. आम्ही हे करू शकलो नाही. जर आम्ही 10 विकेट घेतल्या असत्या आणि इंग्लंडची धावसंख्या आमच्या आसपास असती. तर पाचव्या दिवशी 220 धावा करणे कठीण झाले नसते. यावर एक संघ म्हणून काम करावे लागेल. पहिल्या डावातील फलंदाजी आणि गोलंदाजीतून संघाला काय योगदान मिळत आहे. आगामी काळात यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.
शान मसूद पुढे म्हणाला, ‘आम्ही या गोष्टीत संघर्ष करत आहोत, आम्ही चांगल्या स्थितीत येत आहोत. पण आता सामना कसा पूर्ण करतो हे पाहावे लागेल. तुमच्याकडे किती आघाडी आहे त्यानुसार दुसऱ्या डावात 220 धावा ही चांगली धावसंख्या ठरू शकते. इंग्लंडकडूनही आपण शिकू शकतो. त्यांनी 20 विकेट घेण्याचे मार्ग शोधले. एक संघ म्हणून आम्हाला दुसऱ्या डावात आमच्या फलंदाजीवर काम करावे लागेल आणि 20 विकेट्स घ्यायला शिकावे लागेल. आगामी काळात हे आमच्यासाठी आव्हानात्मक असेल. आम्ही मालिकेच्या मध्यभागी पोहोचलो आहोत, आम्ही संघातील मानसिकता आणि सातत्य याबद्दल बोलत आहोत. जिथे आपल्याला अधिक चांगले असणे आवश्यक आहे. खेळपट्टी कोणतीही असो, जिंकण्यासाठी मार्ग शोधावे लागतात. हे इंग्लंडने दाखवून दिले आहे.
हेही वाचा-
3 खेळाडू ज्यांना न्यूझीलंड कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात संधी मिळण्याची शक्यता
WTC गुणतालिकेत पाकिस्तान तोंडघशी! इंग्लंडविरुद्ध पराभवानंतर वाईट परिस्थिती, भारताचं स्थान जाणून घ्या
‘संपूर्ण जग हसत…’, पाकिस्तानचा हा माजी दिग्गज बाबर आझमवर संतापला