पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यतील कसोटी मालिका गुरुवारी (1 डिसेंबर) सुरू झाली. मालिकेतील पहिला सामना रावलपिंडी याठिकाणी खेळला जात आहे. पहिल्या सामन्यात इंग्लंड संघ नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत आहे. इंग्लंडचे सलामीवीर फलंदाज या सामन्याच चांगल्या लयीत दिसले. बेन डकेत तब्बल 6 वर्षांनंतर इंग्लंडच्या कसोटी संघात परतला आहे. पुनरागमनानंतर पहिल्याच कसोटी सामन्यात डकेतने शतक ठोकल्यामुळे त्याचे कौतुक होताना दिसते.
इंग्लंड संघ कसोटी मालिका खेळण्यासाठी तब्बल 17 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये दाखल झाला आहे. असात दोन्ही संघांतील ही कसोटी मालिकेविषयी चाहत्यांमध्ये अधिकची उत्सुकता आहे. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी झॅक क्राउले (Zak Crawley) आणि बेन डकेत (Ben Duckett) इंग्लंडच्या डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानात आले. या दोघांनी 14 व्या षटकात संघाची धावसंख्या 100 पार नेली. तर पुढच्या 100 धावा करण्यासाठी त्यांना अजून 16 षटके खेळावी लागली. इंग्लडने 30.1 षटकात एकही विकेट न गमावता 200 धावा पूर्ण केल्या.
पाकिस्तान संघला पहिली विकेट 36 व्या षटकात मिळाली. या षटकात इंग्लंडची धावसंख्या 233 होती. सलामीवीर जॅक क्राउले 111 चेंडूत 122 धावा करू शकला, तर बेन डकेत 110 चेंडूत 107 धावा केल्या. डकेत मागच्या सहा वर्षांपासून इंग्लंडच्या कसोटी संघातून बाहेर होता. पण शतकीय खेळीसह त्याने संघात जोरदार पुनरागमन केले आहे. डकेतने यापूर्वी इंग्लंडसाठी चार कोसीट सामन्यांमध्ये 110 धावा केल्या होत्या. कडेतने कारकिर्दीतील हे चारही कसोटी सामने 2016 मध्ये खेळले होते आणि त्यानंतर तो नेहमीच संघातून बाहेर राहिला. मात्र, पुनरागमनानंतर पहिल्याच सामन्यात शतक ठोकल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
वयाच्या 22 व्या वर्षी पदार्पण करणारा डकेत सध्या 28 वर्षांचा आहे आणि हा त्याचा पाचका कसोटी सामना आहे. त्याच्या पदार्पणावेळा जो रुट संघाचा कर्णधार होता, तर ट्रेवर बेलिस इंग्लंडचे प्रशिक्षम म्हणून कामकाज पाहत होते. 2017 मध्ये तो ऍशेस मालिकेसाठी इंग्लंडमध्ये होता. इंग्लंड-प्लेइंग इलेव्हनसोबत त्याला सराव सामना खेळायचा होता. पण या सामन्याआधी त्याने कसोटी संघाचा उपकर्णधार जेम्स अँडरसन याच्या अंगावर बिअर फेकली होती. या प्रकणानंतर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवला गेला होता. त्याची एकंदरीत कारकिर्द पाहिली, तर तर ती असाच विवादांमध्ये राहिली आहे.
असे असले तरी, चालू वर्षातील त्याचे प्रदर्शन जबरदस्त राहिले आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्याला राष्ट्रीय संघात पुन्हा संधी दिली गेली आहे. त्याने यावर्षी 76 च्या स्ट्राईक रेटने धावा केल्या असून प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांना त्याचे प्रदर्शन आवडल्याचे सांगितले जात आहे. मॅक्युलम इंग्लंडचे प्रशिक्षक बनल्यापासून त्यांच्या प्रदर्शनात चांगलाच आक्रमकपणा आला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीत देखील इंग्लंडने अशाच पद्धतीने आक्रमक फलंदाजी करत मोठी धावसंख्या केली. (Ben Duckett returns to the England Test team after six years.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
रोहित, विराटबरोबर टीम इंडिया लवकरच बांगलादेशला पोहोचणार; जाणून घ्या संघ आणि वेळापत्रक एकाच क्लिकवर
AUSvWI: शतक करताच स्टीव्ह स्मिथने केली ब्रॅडमन यांची बरोबरी, विराट कोहली घसरला तिसऱ्या स्थानी